Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
  LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.
Breaking News : बाबरी निकाल : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, कोर्टाचा निकाल    तब्बल २८ वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष न्यायालयात आज निर्णय सुनावला.    करोना: देशभरात २४ तासांत वाढले करोनाचे ८०,४७२ नवे रुग्ण    गणपती बाप्पाच्या आगमणाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेत्यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा    जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 72 लाखांवर    वडनेरे समितीच्या अहवालावर पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधीशी चर्चा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील    सोनू सूदला वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखले!    करोना संकटात इंधन दरवाढीची हॅटट्रीक; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले    मान्सूनचे १ जूनला केरळात आगमन;अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र    राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा    केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा, लॉकडाऊनबाबत राज्यांकडून सूचना मागवल्या    काँग्रेसची Speak Up India मोहीम, मजुरांच्या स्थलांतरावरून सोनिया गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल   
 जिमाका     12-Feb-21 50

शिधापत्रीकेच्या ई-केवायसी बाबत मासिक बैठक संपन्न

शिधापत्रीकेच्या ई-केवायसी बाबत मासिक बैठक संपन्न

लातूर (जिमाका) : लातूर तालुक्यातील एकूण 248 रास्त भाव दुकानदार यांची मासिक आढावा बैठक डीपीडीसी हॉल, प्रशासकीय इमारत, लातूर या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहिम शासन निर्णय दिनांक 28 जानेवारी 2021. ई-केवायसी, सायलेंट आरसी, चलन भरणा कालावधी व इतर अनुषंगिक बाबी व अडचणी बाबत चर्चा करण्यात आली.

सर्व रास्त भाव दुकानदारांना त्यांचेकडील शिधापत्रिकेवरील ज्या ग्राहकांचे आधारकार्ड ऑनलाईन प्रणालीवर ईकेवायसी आधारकार्ड उपलब्ध्‍ करुन न दिल्यामुळे तसेच Epos मशीनवर आपल्या अंगठयाचे ठसे न उमटविल्यामुळे शिल्लक राहिलेले आहे त्याची यादी या कार्यालयाकडून उपलब्ध्‍ करुन देण्यात आलेली आहे. त्यांचे आधारकार्ड तात्काळ Update करुन घेणे बाबत शहरी भागातील रास्त भाव दुकानदारांच्या नोटीस बोर्डावर व ग्रामीण भागाकरीता रास्त भाव दुकानात व ग्रामपंचायत कार्यालयात ऑनलाईन ईकेवायसी करावयाच्या शिल्लक राहिलेल्या व्यक्तींच्या नावाची यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

रास्त्‍ भाव दुकानदार यांच्याकडे उपलब्ध्‍ असलेल्या यादीतील शिधापत्रिका धारकांनी आपण तात्काळ रास्त भाव दुकानदार यांचेकडे हजर राहून आपले नांव ऑनलाईन शिधापत्रिकेमध्ये आधारकार्ड सोबत घेवून जाऊन स्वत: Epos मशीनवर आपला अंगठा लावून Update करुन घ्यावे. ज्या व्यक्तीने / ग्राहकाने आपले नांव Update करुन घेतलेले नाही त्या शिधापत्रिका धारकास धान्य वाटप होणार नाही. व धान्य न मिळाल्याने धान्य मिळाले पासून आम्हाला वंचित ठेवण्यात आले आहे हे म्हणणे ऐकून घेण्यात येणार नाही. शिधापत्रिकाधारकांनी त्यांची नांवे Epos मशीनवर Update करुन घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही शिधापत्रिका धारकांची राहील असे तहसिलदार स्वप्नील पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


 प्रतिनिधी     16-May-20 50

लातूर मामनपाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांना पदोन्नती

लातूर मामनपाच्या इतिहासात प्रथमच कर्मचाऱ्यांना पदोन्नती 

कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपीक तर १२ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदी पदोन्नती

कर्मचाऱ्यांनी मानले महापौर-उपमहापौर यांचे आभार

लातूर : लातूर शहर महानगरपालिका आस्थापनेवर सुमारे ९०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असून यापैकी सर्वाधिक कर्मचारी वर्ग वर्ग श्रेणी मधील आहेत. कर्मचाऱ्यांना मागील अनेक वर्षापासून पदोन्नतीची प्रतीक्षा करावी लागत होती. पालकमंत्री नामदार अमित विलासराव देशमुख यांनीही कर्मचाऱ्यांचा मागणीचा सकारात्मक विचार करण्याच्या सूचना केलेल्या होत्यायाच अनुषंगाने लातूर महानगरपालिकेत वर्ग वर्ग मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांना वरिष्ठ लिपिक तर १२ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली. याबाबतचे आदेश मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी निर्गमित केले आहेत.

अनेक वर्षाची प्रतीक्षा संपत मनपाच्या इतिहासात प्रथमच पदोन्नती मिळाल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची भेट घेत त्यांचे आभार व्यक्त केले. कनिष्ठ पदावर कार्यरत असलेले राघवेंद्र नाईक, एस. एम निरगुडे, जाफरपाशा कादरी यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्यात आली तसेच वर्ग चार श्रेणी मध्ये कार्यरत असलेले संतोष लाडलापुरे, बंडू आर्विकर, बालाजी शिंदे, संतोष ठाकूर, अनिल सूर्यवंशी, प्रदीप जोगदंड, छाया आखाडे, प्रवीण कांबळे, महादेव साठे, असलम शेख, सजन शेख, रंदावनी पवार, यांना कनिष्ठ लिपिक पदी पदोन्नती देण्यात आली.

मनपा कर्मचाऱ्यांना मिळालेले पदोन्नती मुळे कर्मचाऱ्यांच्या मनोबल वाढीस लागून मनपाच्या कार्यक्षमतेमध्ये भर पडणार आहे.


 प्रतिनिधी     15-May-20 50

लातूर जिल्ह्यातील 25 व्यक्तींच्या स्वॅब पैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर उदगीर येथील 2 व चाकूरच्या एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित

लातूर जिल्ह्यातील 25 व्यक्तींच्या स्वॅब पैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर उदगीर येथील 2 व चाकूरच्या एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणी

लातूर : विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत शुक्रवार रोजी एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी सर्वच 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते  त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत.  किल्लारी येथील ३ व्यक चे स्वॅब तपासणीसाठी  आले होते त्या सर्वच ३ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आहेत. चाकुर येथील एका व्यक्तींचे स्वॅब तपाणीसाठी आले होते त्या व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे. 

बीड येथील 17 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्या सर्व १७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 4 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 15 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत असे एकुण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 43 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 18 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर व विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. गिरीष ठाकुर यांनी यांनी दिली.


 जिमाका,     27-Jun-19 50

ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे – जिल्हाधिकारी

ग्रामस्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे – जिल्हाधिकारी

हलगर्जीपणा करणाऱ्यां संबंधितावर शिस्तभंगाची व कायदेशीर कार्यवाही करणार

लातूर : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे होणारे जीवित व वित्तहानी बाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यासाठी तसेच आपतग्रस्ताना तात्काळ मदतीसाठी समन्वय साधणेसाठी जिल्हा/ तालुका आपत्कालीन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आलेला आहे. यासाठी दर तासाला संबंधित कार्यालयाकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती मा. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री महोदय, मा. मुख्य सचिव, व इतर वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात येते. ज्यायोगे ते आदेश, सूचना देणे व कार्यवाहीचे निर्देश देणे सुकर होत. तसेच याबाबत आवश्यक ती उपाययोजना करणेबाबत वेळोवेळी शासनाकडून निर्देश दिले आहेत.

 

     बऱ्याच वेळेस गावस्तरावरील कर्मचारी (तलाठी/मं.अ./कृषी सहाय्यक/ ग्रामसेवक) मुख्यालयी उपस्थित राहत नाहीत, त्यामुळे जिल्हा/ तालुका नियंत्रण कक्षातून दिलेल्या धोक्याचे इशारे संबंधित गावकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत, त्याचबरोबर पूरपरिस्थितीत गावातील/नाल्यातील पुलावरुन योग्य वेळी वाहतूक निर्बंध न घातल्याने नागरिक धोका पत्कारतात त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. सद्दस्थितीत असलेल्या टंचाईच्या अनुषंगिक कामासाठी जिल्हयातील सर्व गावस्तरावरील कर्मचारी (तलाठी/मं.अ./कृषी सहाय्यक/ ग्रामसेवक) यांनी आपल्या मुख्यालयी उपस्थित रहावे. याबाबत हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर शिस्तभंगाची व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाईल, याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहे.


 प्रतिनिधी,     28-Jun-19 50

श्री देशिकेंद्र विद्यालयाचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

श्री देशिकेंद्र विद्यालयाचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

लातूर : फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत येथील श्री देशिकेंद्र विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून, विद्यालयाचे २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यात पूर्व उच्च प्राथमिकचे (पाचवी) ८ तर, पूर्व माध्यमिकचे (आठवी) १६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ओंकार पाटील, रुद्राक्ष बिराजदार, निखील शिंदे, वेदांत सोमवंशी, श्रेयश भेटे, सिद्धेश ठोंबरे, विवेकराजे केंद्रे, सुयश स्वामी तर, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सार्थक खुणे, वैष्णवी पाटील, कल्याणी लहुरीकर, धनंजय पांढरे, सार्थक मठपती, अभिषेक जगताप, रत्नदीप सोनटक्के, वेदांत मुडपे, चिन्मय जोशी, गोविंद कुंटे, वैभव कुंडकर, धीरज घुले, शंतनू आमले, श्रीनिवास मुंजेवार, सुजल मुठ्ठे, ऋतुराज थळकर हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.


 प्रतिनिधी,     10-May-19 50

दर्जी बोरगावकर भीषण पाणी टंचाईने व्याकुळ

दर्जी बोरगावकर भीषण पाणी  टंचाईने व्याकुळ

आम आदमी पार्टीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन

लातूर : लातूर जिल्ह्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई असून, रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव हेही त्याला अपवाद नाही, तेव्हा येथील पाणी टंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने येथे त्वरीत पाणी पुरवठ्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आम आदमी पार्टीच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव या गावाची लोकसंख्या जवळपास हजारांच्या घरात आहे.या गावात सध्या पिण्याच्या पाणी परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या गावात पाणवठ्याची कुठलीच सोय नाही,परिमाणी नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा आणि अहोरात्र जागरण करावे लागत आहे, पाण्याशिवाय कोणतेही काम करता येत नाही.इथली पाणी टंचाई लोकांच्या जीवावर उठली आहे, यावर प्रशासनाने तातडीने पावले उचलून या गावाला पाणी पुरवठ्याची त्वरीत सोय करावी, अशी मागणी आम आदमी पार्टी जिल्ह्यच्यावतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी जिल्हा आपचे सुमीत दीक्षित, प्रसाद काळे, शाहरुख शेख, विक्रांत शंके, गीता पाटील, मधु सोनवणे, विशाल जाधव, विवेक जाधव, रोहित बिराजदार यांंच्या अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


 प्रतिनिधी,     10-Apr-19 50

श्रमिक जनतेचा देश मेरा, वोट मेरा, मुद्दा मेरा जाहीरनामा गुरुवारी प्रकाशित होणार

 

श्रमिक जनतेचा देश मेरा, वोट मेरा, मुद्दा मेरा जाहीरनामा गुरुवारी प्रकाशित होणार

लातूर : लातूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील असंघटित कष्टकर्यांच्या जीवनाशी निगडीत  प्रश् आणि संंविधान मूल्यांवर काम करणार्या संघटनांच्यावतीने  देश मेरा,वोट मेरा,मुद्दा मेरा या जाहीरनाम्याचे प्रकाशन गुरुवार, दि.११ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी वाजता पत्रकार भवन,लातूर येथे करण्यात येणार आहे. तरी लातूर जिल्ह्यातील कष्टकर्यांचे काम करणार्या संस्थाकार्यकत्यार्ंंनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जगण्याचे हक्क आंदेालनाच्या पुढाकाराने श्रमित जनतेचा जाहिरनामा नुकताच मुंबईत प्रकाशित करुन राजकीय पक्षांना त्यांवर भूमिका घ्यायला भाग पाडले आहे, या जाहिरनाम्यात रेशनपेन्शन पासून शेतकर्यांची कर्जमुक्ती हमी भाव, सिंचन आणि सत्ताधार्यांपासून रोज होणारी लोकशाही मुल्यांची पायमल्ली याचा समावेश तर आहेच पण जाती धर्मात विद्वेष पसरवून ऐन निवडणूकीत सर्व सामान्यांचे खर्या जगण्याच्या मुद्यावरुन लक्ष विचलीत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु आहे. तो कठोरपणे हाणून पाडणे हाही हेतू यामागे असून, श्रमिक जनतेचा जाहीरनामा परिषदा, निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारास, गरीब कष्टकर्यांच्या जगण्याच्या प्रश्नांवर बोलण्यास भाग पाडण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात या परिषदांचे आयेाजन केले आहे,त्याचा एक भाग म्हणून गुरुवारदि.११ एप्रिल १९ रोजी सायंकाळी वाजता पत्रकार भवनलातूर येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून श्रमिक जनतेचा जाहिरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे.

यावेळी प्रा.प्रदीप पुरंदरे, उल्का महाजन, धनाजी गुरव, साथी सुभाष लोमटे हे कामगार   श्रमिकांच्या प्रश्नांवर काम करणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी लातूर जिल्ह्यातील श्रमिकांच्या प्रश्नांशी आस्था करणार्या,असंघटित क्षेत्रातील कष्टकर्यांसाठी काम करणार्या कार्यकत्यार्ंंनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संदीपान बडगीरे,माधव बावगे,रंगा राचूरे, ऍड.उदय गवारे, कॉ.विठ्ठल मोरे,राजकुमार होळीकर,डॉ.संजय गवई, प्रताप भोसले, प्राचार्य डॉ.मधुकर मुंडे, साहेबअली सौदागरबाळ होळीकरसुमित दीक्षित, नितीन चालक  आदिंनी केले आहे.

 


  जीमाका     08-Apr-19 50

जिल्हयात 9 एप्रिल रोजी ड्रोन व तत्सम उपकराणांच्या वापरावर बंदी

जिल्हयात 9 एप्रिल रोजी ड्रोन व तत्सम उपकराणांच्या वापरावर बंदी

लातूर: भारत निवडणूक आयोगाने दिनांक 10 मार्च 2019 रोजी च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून,कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अमंलात आल्याने लातूर जिल्हयातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टाकोनातून सभा,मिरवणूक,निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक आहे.

तसेच पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी दिनांक 9 एप्रिल रोजी औसा तालुक्यातमध्ये जाहिर सभा होणार आहे. त्याअनुषंगाने विशेष सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी सकाळी 6-00 ते दुपारी 4-00 वाजेपर्यत लातूर जिल्हयाच्या संपूर्ण हद्दीत ड्रोन व तत्सम उपकरणांचा वापराव फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निर्बध घालण्यात येत आहेत,असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.


 प्रतिनिधी     08-Apr-19 50

विकासाची गती कायम ठेवण्यासाठी भाजपाला विजयी करा : नगराध्यक्ष बागबंदे

विकासाची गती कायम ठेवण्यासाठी  भाजपाला विजयी करा : नगराध्यक्ष बागबंदे

उदगीर :  गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आलेल्या विकास निधीतून या भागाचा विकास झाला आहे, विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार निवडून द्या, असे आवाहन उदगीरचे नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी केले.

लातूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारार्थ उदगीर शहरात आयोजित कॉर्नर बैठकीत नगराध्यक्ष बागबंदे बोलत होते. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा भाजपाचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, गटनेते बापूराव यलमटे, पाणीपुरवठा सभापती मनोज पुदाले, नगरसेवक ॅड. दत्ताजी पाटील, आनंद बुंदे, आनंद साबणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळात उदगीर नगर परिषदेला मोठा विकास निधी मिळाला आहे. त्यामुळे आज शहर विकासाकडे वाटचाल करीत आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहराची कायमस्वरूपी पाण्याची सोय होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचत गटाच्या महिलांना स्वबळावर उभे राहण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचविला आहे. त्यामुळे महिला भगिनींची धुराच्या त्रासापासून सुटका होत आहे. याशिवाय केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक लोकहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनेची माहिती हर हर मोदी घर घर मोदी या अभियानाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न करावेत असे आवाहन करून नगराध्यक्ष बसवराज बागबंदे यांनी विकासाची गती कायम ठेवण्यासाठी परत एकदा मोदी सरकारला निवडून द्या असे आवाहन केले.


 प्रतिनिधी,     07-Apr-19 50

राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी

राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी 

मुंबई येथे बुधवार दि. 17 एप्रिल 2019 रोजी होणार्या राज्यव्यापी वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून या महामेळाव्यात वधू-वरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

लिंगायत महासंघ महाराष्ट्र प्रदेश शाखेच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांच्या नेतृत्वाखाली भव्य राज्यव्यापी वीरशैव लिंगायत समाजातील विवाह इच्छुक उपवर-उपवधूंचा परिचय महामेळावा बुधवार दि. 17 एप्रिल 2019 रोजी सकाळी 9.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या वधूवर परिचय महामेळाव्यात लिंगायत, वाणी, वीरशैव, हिंदु लिंगायत, पंचम, दिक्षीवंत तसेच स्वामी, जंगम, माळी, तेली, कुंभार, शिंपी . लिंगायत समाजातील पोटजातीचा ही यात समावेश असणार आहे तसेच घटस्फोटीत, विधवा, विधूर यांनाही या महामेळाव्यात भाग घेता येईल.

वीरशैव लिंगायत समाजाचा 35 जिल्ह्याला केंद्रबिंदु ठेवून होणारा हा पहिलाच महामेळावा असल्याने समाजात उत्सुक्ता पसरली आहे. महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा गुजरात राज्यातून नामवंत डॉक्टर, इंजिनियर, कपंनीतील अधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, उद्योजक, व्यवसायिक लहान मोठे सर्व मनपसंद स्थळे या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नाव नोंदणी सुरू आहे. तसेच ऑनलाईन वर ही नाव नोंदणी सुरू आहे. इच्छुक वधू-वरांनी या पालकांनी आपले नावे त्वरित नोंदवावीत ज्यांना अगोदर नाव नोंदवणे शक्य नाही झाल्यास कार्यक्रम स्थळी सुध्दा नाव नोंदवता येईल. अधिक माहितीसाठी 9890099792, 70306066664 या क्रमांकावर संपर्क साधावा अजुनपर्यंत नाव नोंदणी केली नसेल तर प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री मनोज पोतदार यांनी केले आहे


LCN24 लईभारी

ग्लोबल स्पेशल

 • 15-02-2020 50

  कोरोना विषाणूची मायक्रोस्कोपीक छायाचित्रे प्रसिद्ध; हे आहेत कोरोनाची कारणे व लक्षणे

  कोरोना विषाणूची मायक्रोस्कोपीक छायाचित्रे प्रसिद्ध; हे आहेत कोरोनाची कारणे व लक्षणे

  वॉशिंग्टन (lcn24 ऑनलाईन) : चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे हाहाकार सुरुच आहे. आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग होऊन १,५२३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ६६,४९२ वर पोहोचली आहे. आता कोरोनाची (कोविड-१९) स्कॅनिंग आणि ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीक छायाचित्रे अमेरिकेच्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजीस'ने (एनआयएआयडी) प्रसिद्ध केली आहेत.

  कोरोना विषाणूची ही छायाचित्रे २०१२ मध्ये मध्य पूर्वेतील देशांमधून आढळून आलेल्या 'मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम-कोरोना व्हायरस' (मर्स) पेक्षा फारशी वेगळी नसल्याचे 'एनआयएआयडी'ने म्हटले आहे.

  कोरोना विषाणू हा जगासाठी मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग २५ देशांमध्ये पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण झाला याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेसह अनेक देश कोरोना विषाणूवर लस शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्याला यश आलेले नाही. 

  हा आजार कसा पसरतो?

  हा संसर्गजन्य आजार आहे. हे विषाणू एकाकडून दुसर्‍याकडे संक्रमित होऊनच आपले अस्तित्व टिकवतात. प्राण्याकडून मनुष्याकडे संक्रमित होणे हाही एक अस्तित्व टिकवण्याचा प्रकार आहे. प्रथम हा विषाणू भक्ष्याची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी करतो आणि आपली संरचना बदलतो. याप्रकारे हा आजार वेगाने प्रसारित होतो.

  या आजाराची लक्षणे कोणती? 

  सर्वसामान्य लक्षणे ही ताप, सर्दी खोकला, श्‍वसनाला त्रास होणे व न्यूमोनिया ही असतात. काही रुग्णांमध्ये श्‍वसनाच्या त्रासाव्यतिरिक्‍त उलटी, मळमळ व डायरिया ही लक्षणे असू शकतात.

Top