Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

गणेश चतुर्थीचा लातूरसह देशभरात उत्साह

गणेश चतुर्थीचा लातूरसह देशभरात उत्साह

गणेश चतुर्थीच्या राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा

लातूर : गणेश चतुर्थीचं पर्व संपूर्ण देशभरात उत्साहात साजरं करण्यात येत आहे. लातूर शहरातही गणेशाच्या आगमनाचा उत्साह पहावयास मिळत आहे. बुद्धिचं दैवत असलेल्या विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे वातावरण प्रसन्न झालं आहे. कोरोनामुळे यंदाचा गणोशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख, शांती नांदते. तसेच येणारी सर्व संकटं दूर होतात. गणेश चतुर्थीच्या राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गणपती बाप्पाच्या आगमणाच्या या पावन पर्वावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गणेश चतुर्थीच्या या पर्वात कोरोनाचं संकट संपावं अशी कामना केली आहे. ते म्हणतात, "गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हे पर्व भारतातील लोकांच्या अदम्य उत्साह, उमंग आणि उल्हासाचे प्रतिक आहे. माझी प्रार्थना आहे की, विघ्नहर्ता श्री गणेशजीच्या कृपेने कोविड-19 ची महामारी संपावी आणि सर्व देशवासियांना  सुखी आणि निरोगी जीवन मिळावं".

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट होवो".

Top