Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

सोयाबीन पिकास कमी शेंगा लागल्याने कृषी विभागाने केला क्षेत्रीय पाहणी

सोयाबीन पिकास कमी शेंगा लागल्याने कृषी विभागाने केला क्षेत्रीय पाहणी

लातूर (जिमाका) : लातूर तालुक्यातील बामणी, भंडी, भातंगळी, तर रेणापूर तालुक्यातील आनंदवाडी आणि चाकूर तालुक्यातील मुरंबी, सुगाव या गावातील काही शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांना शेंगा लागल्या नसल्याच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने तक्रार प्राप्त गावामध्ये पाहणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सल्ला देण्यासाठी लातूर जिल्हयामध्ये कृषी विद्यापीठ व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञासह प्रक्षेत्र भेटीचे नियोजन करण्यात आले होते. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

सदरील प्रक्षेत्र भेटी दरम्यान पुढील बाबी आढळून आल्या आहेत. सर्व तक्रार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतावर सोयाबीनची उभी कायिक वाढ (vegetativegrowth) आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याचे आढळून आली. तक्रार प्राप्त शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रकार भारी जमितनीत (Black Cotton Soil) मोडत असल्याचे आढळून आले. भारी जमिनीत ज्या ठिकाणी झाडांची गर्दी झाली आहे अशा ठिकाणी जास्तीची उभी कायिक वाढ झाल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढून शेंगाचे प्रामाण 30 टक्कयांनी कमी आढळून आले.

सोयाबीन पिकाच्या जमिनीलगतच्या भागात आद्रतेचे (Humidity) प्रमाण जास्त झाल्यामुळे खोडावर पानावर आणि काही प्रमाणात शेंगावर करपा (Bliht) रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास आढळून आला. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकात 30 ते 35 दिवसादरम्यान कीटकनाशकाची फवारणी होणे आवश्यक होते ती न झाल्यामुळे आणि जास्तीची कायिक वाढ झाल्यामुळै चक्रीभुंगा खोडमाशी उंटअळी आणि स्पोडोप्टेरा या किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानपातळीच्या पुढे आढळून आला. सोयाबीनची अतिरिक्त कायिक वाढ झाल्यामुळै (सोयाबीन माजणे) सद्य परिस्थितीमध्ये पिकांमध्ये फवारणीसाठी

मजूर तयार होत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

कमी शेंगा लागण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. चालू वर्षी सुरुवातीपासून पावसाचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहिल्यामुळे तसेच भारी जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता व अन्नद्रव्य पुरवठा करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ज्या टप्प्यावर सोयाबीन पिकाची कायिक वाढ थांबणे आवश्यक होते ती न थांबता पुढे वाढत राहिल्यामुळे या वर्षी भारी जमिनीत सोयाबीनची उभी कायिक वाढ जास्त आढळून आली. सोयाबीन पिकात शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये, पावसाच्या संततधारेमुळे (पावसाची झड) आणि जास्तीच्या कायिक वाढीमुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले होते. या पोषक वातावरणामुळे चक्रीभुंगा, खोडमाशी,उंटअळी, स्पोडोप्टेरा शेंगा पोखरणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव वाढून काही प्रमाणात या अळयाकडून फ्लॉवर बड खाल्यामुळे झाडावरील शेंगाचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून येत आहे.

मागील 10 ते 12 दिवसादरम्यान चालू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे आणि अतिरिक्त कायिक वाढीमुळे बुरशीजन्य रोग जसे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ झालेली आहे अशा ठिकाणी मागील 10 ते 12 दिवसापासून फवारणीसाठी मजूर तयार होत नसल्यामुळे फवारणी अभावी किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

त्वरित करावयाच्या उपाययोजना :

अशा परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी खालील कीटकनाशकापैकी एका किटकनाशकाची आणि बुरशीनाशका पैकी एका बुरशीनाशकाची निवड करुन तात्काळ फवारणी घेतली असता किडीचे आणि बुरशीजन्य रोगांचे नियंत्रण होऊन चांगल्याप्रकारे शेंगात दाणे भरण्यास मदत होईल.

कीटकनाशके :

क्लोरॅनट्रीनीलप्रोल 18.5 टक्के (कोराजन)-03 मिली, फ्युबेंडामाईड 39.35 टक्के (फेम)-2.5

मिली, प्रति 10 लिटर पाणी. बुरशीनाशके :- टेब्युकोनॅझोल+ सल्फर (स्वाधीन)-20 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब + कार्बेन्डॅझीम (साफ)-20 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रॉबीन 20 टक्के (हेडलाईन)-20 ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल 25.9 टक्के (फॉलीक्यूअर )-15 मिली प्रति 10

लिटर पाणी.

वरील कीटकनाशके व बुरशीनाशकाचे प्रमाण चार्जिंगच्या पंपासाठी दुप्पट तर पेट्रोलपंपासाठी तिप्पट करावे. सोयाबीन पिकास पुनर्बहार येत असल्यामुळे याठिकाणी किडींच्या प्रार्दुभावामुळे शेंगा लागल्या नाहीत अशा शेतकऱ्यांनी पुनर्बहारासाठी 8 ते 10 दिवासाची वाट पाहावी.

दुरगामी करावयाच्या उपाययोजना :

भविष्यात सोयाबीनची अतिरिक्त कायिक वाढ करण्यासाठी व कोणत्याही परिस्थितीमध्ये कीड व रोगांचा प्रार्दुभाव नियंत्रित ठेवण्यासाठी फवारणी घेता यावी यासाठी सोयाबीन पिकाची पेरणी रुंद वरंबा सरी पध्दतीवर (BBF Method) करणे आवश्यक आहे.सोयाबीन पिकात बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे रासायनिक बीजप्रक्रियाबरोबरच (थायरम + कॅर्बोन्झिन) शेंगात दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये शिफारस केलेल्या एका बुरशीनाशकाची फवारणी घेणे आवश्यक आहे. सोयाबीन पिकात पेरणीनंतर नत्रयुक्त खताचा (युरिया) वापर टाळणे अत्यंत आवश्यक आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Top