Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

सिंचनातून समृधि, सहकारातच ग्रामीण प्रगती - अभियंता नितीन पाटील, जलसंपदा विभाग, लातूर

सिंचनातून समृधि, सहकारातच ग्रामीण प्रगती - अभियंता नितीन पाटील, जलसंपदा विभाग, लातूर

पाऊसपाणी, मातीत उगवणार सोन्याची नाणी!

लातूर : काही भागात अतिवृष्टी, काही भागात मध्यम तर काही भागात सौम्य पाऊस यामूळे पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे सिंचन व्यवस्थापन व नियोजन करणे आवश्यक आहे. लातूर शहराच्या पुर्व पश्चिम वाहणारे मांजराचे पात्र, आता सध्या स्वच्छपाण्याने हे पात्र कोठोकाठ भरून सर्व उच्च-पातळी बंधारे ओसंडत असुन, जलसंपंदाचे सिंचन व्यवस्थापन कर्मचारी व अधिकारी यासाठी आरोग्याची तमा न बाळगता व अशा संसर्ग परिस्थीतही ही लातूरकरांसाठी या गंगेचा हा भरीवपणा, रात्रदीवस आटोकाट प्रयत्न करत भरतीत ठेउन त्यास आहोटी लागू देत नाहीत. प्रत्येक पाण्याच्या लाटेला अलगद अडवून व नुकसान न होता ती अलगद दुसर्या बंधाऱ्या द्वारे परिचलन करुन व विसर्ग नियमन करुन अहोरात्र पहारा देत दक्ष आहेत. सिंचन क्षेत्रीय अधिकार्यांची ही एक प्रकारचीअग्नी परीक्षाच आहे.

शहराला वळसा घालुन, दक्षीणेकडील कर्नाटकात जाणारी ही मांजरा, पश्चिम भागत मध्यम पाऊस असल्याने सध्या धरणात 47% एकुण साठा असुन तो या उच्च पातळी बंधारा सारखा 100% व्हावा असे सर्वानाच वाटते. याच पाठोपाठ लगतची तावरजा नदी व त्यावरील प्रकल्प हे ही अशाच प्रतिक्षेत आहेत. पाणलोट क्षेत्रात या आठवड्यात चांगल्या प्रकारचा पाऊस पडत असुन, या पाणलोट क्षेत्रातील जलसंधारणचे पाझर तलाव, सी. एन. बी. व लघु प्रकल्प हळूहळू भरावयास सुरवात झाली असुन, हे ज्यावेळी पूर्ण संचय पातळी भरून वाहतील व ज्यावेळी या नदीस मिळतील त्यावेळी तावरजा मध्यम प्रकल्पांचा पाण्याच्या साठा हळूहळू पण निश्चिंतच वाढेल.

कोरडा पडलेला हा परिसर या ओलाव्यामुळे व हिरवाईमुळे जिवंत झाल्यासारखा वाटत आहे. या परिसरास भेट देऊन पाण्याचा आढावा घेताना व फोटो काढत असताना तो पाण्याच्या माध्यमातून आजूबाजु असलेल्या सर्वाना खुणावत आहे असा भास होत होता. पावसाच्या पाण्याने शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारे व कष्ट करणारे तसेच दुधाच्या व्यवसायासाठी पाळीव प्राणी पाळणारे कष्टकरी एवढे खुष आहेत की त्यानी हातास धरून पाण्यात उतरण्याचा हट्ट केला, त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, शेतकरी, शेतीवर अवलंबून असणारे व कष्ट करणारे तसेच नागरिकांना निसर्गाने सढळ हस्ते मदत करायला हवी एवढेच या क्षणी मनापासून वाटले. हातात आलेले आगात पडू दे, व रब्बी उन्हाळी जोमात येऊ दे! हीच निसर्गास प्रार्थना

- अभियंता नितीन पाटील, जलसंपदा विभाग, लातूर

Top