Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत -पालकमंत्री अमित देशमुख

अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने 48 तासात पूर्ण करावेत -पालकमंत्री अमित देशमुख

राज्य शासन नैसर्गिक आपत्तीत पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे

जिल्ह्यातील विविध पाणी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध

लातूर : जिल्ह्यात मागील चार-पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने 48 तसं पूर्ण करावे तसेच शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा शासन पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देशमुख पत्रकारांशी बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे उपस्थित होते.

पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, कालच निलंगा व औसा तालुक्याच्या काही गावात अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाची पाहणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच घरांची पडझड, जनावरांची हानी आणि रस्ते व पुलांचे नुकसान प्रशासनाने त्याचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे शेती पिकाचे पंचनामे पुढील 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीने पुरामुळे शेतजमिनीचे ही नुकसान झालेले आहे जसे की माती वाहून जाणे त्यामुळे अशा ठिकाणी शेतकरी रब्बी पेरणी करू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी देऊन जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा झाल्याचे सांगून सद्यस्थितीत मांजरा धरणात 90 टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोनखेड व शिवणी भागात जी परिस्थिती उदभवली व बॅरेजमधील पाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान झाले त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आलेले असून चौकशीनंतर जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

Top