Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

रेणा साखर कारखाना गाळप अधिक यशस्वी करत शेतकरी सभासदाना अधिक भाव देणार - माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

रेणा साखर कारखाना गाळप अधिक यशस्वी करत शेतकरी सभासदाना अधिक भाव देणार - माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख

रेणा कारखान्याच्या 15 व्या गळीत हंगामाचा शानदार शुभार्ंभ

रेणापूर : रेणा कारखान्याने आजपर्यंत ऊस गाळपाची यशस्वी परंपरा कायम ठेवुन शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. या गळीत हंगामातही  गाळपाचे उदिष्टे पूर्ण करून गाळपास आलेल्या ऊसाला योग्य तो भाव देवु असा विश्वास व्यक्त करित सभासदांच्या चेहर्यावरिल हास्य हे टिकले पाहिजे  हेच आमचे ध्येय आहे  असे प्रतिपादन रेणा कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

रेणा साखर कारखान्याच्या सन  २०२० -२१  मधील १५  व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी आमदार धिरज देशमुख यांच्या उपस्थीतीत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुण गळीत हंगाम शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, माजी आमदार त्र्यंबकराव भिसे, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक.आबासाहेब पाटील, जागृती कारखान्याचे व्हा.चेअरमन लक्ष्मणराव मोरे, मांजरा कारखान्याचे व्हा.चेअरमन श्रीशैल्य उटगे, विलास कारखाण्याचे  व्हा.चेअरमन रविद्र काळे, श्री संत मारोती महाराज कारखान्याचे व्हा.चेअरमन.शाम भोसले, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन.एस.आर देशमुख, जिल्हा बँकेचे व्हा.चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, जि.म.बँकेचे संचालक अँड. प्रमोद जाधव  जिल्हा परीषद सदस्य .सुरेश लहाणे, रेणाचे चेअरमन  सर्जेराव मोरे, व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी.व्ही.मोरे व इतर मान्यवरांची  उपस्थिती  होती.

पुढे बोलताना  दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, कारखान्याच्या माध्यमातून चालू गळीत  हंगामात ५ लाख मे. टन ऊस गाळप उदिष्टे ठेवले असून ते उदिष्टे पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात सौर उर्जा प्रकल्प ऊभारून त्या माध्यमातून विज निर्मीती केली जाईल व त्याबरोबरच  ईथेनॉल निर्मीतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरून ऊसाच्या रसापासून ईथेनॉल निर्मीती करून शेतकऱ्याना आधिकचा ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकनेंते विलासरावजी देशमुख साहेबांनी विकासाचा जो मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर चालत मांजरा परीवारातील साखर कारखाने शेतकरी हीताची वाटचाल चालू ठेवली.आम्ही राजकारण करत असताना विकासाचे राजकारण केले आकसाचे नाही. यापूढेही सर्वांना सोबत घेवुन जिल्हयाला पुढे घेवुन जायचे आहे. तुम्ही स्वप्न पहा आम्ही ते साकार करू संकटाना घाबरू नका बॅक व कारखाने आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत असा  विश्वास त्यांनी दिला.

शेतक-यांनी पाण्याची बचत करून नवा आदर्श निर्माण करावा - आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आवाहन

सुदैवाने चालू वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणी साठाही मुबलक प्रमाणात उपल्ब्ध आहे. या  पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी पाणी बचतीवर भर देत   तुषार व ठिबक संचाचा वापर करून पीकांना पाणी द्यावे. सध्या कमी पाण्यात व कमी क्षेत्रात आधीक उत्पन्न घेण्याची गरज बनली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांचे सहकार क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. ज्या उद्देशाने लोकनेंते विलासरावजी देशमुख व दिलीपरावजी देशमुख यांनी जिल्ह्यात सहकार चळवळ रूजवली त्या उद्देशास डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरू व पुढे चालू राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना रेणा कारखाना परीसरात स्पर्धा परीक्षा केंद्र व आभ्यासीका सुरू केली असून त्या माध्यमातून सामाजीक दायीत्व पार पाडण्याची भुमीका संचालक मंडळाची आहे. असे सांगून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामीण भागातील सर्वांगीन विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगुन लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण कटिबध्द असून जे काही नवे आहे ते या मतदार संघात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

कोरोणा आजार पुर्णपणे संपुष्टात आला नसल्यानें नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे अवाहन देखील आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांनी केले. तसेच कोरोनावर नियत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी , आशा कार्यकर्ती यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

प्रास्तावीकपर भाषणात रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे म्हणाले की, रेणा कारखाना सर्वाधीक भाव ऊसाला देत असल्याने जो विश्वास शेतक-यांच्या मनात निर्माण झाला आहे तो विश्वास सार्थ ठरवत कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, पालकमंत्री नामदार अमीत विलासरावजी देशमुख, आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात व संचालक मंडळाच्या सहकार्याने रेणा कारखाना चालू गळीत हंगाम यशस्वी करणार आहे त्यामुळे गाळपासाठी रेणा कारखान्याकडे मोठया  प्रमाणात ऊस द्यावा असे आवाहन चेअरमन सर्जेराव मोरे यांनी केले

यावेळी लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी आपल्या मनोगतात रेणा कारखान्याच्या वाटचालीचा गौरव करून गळीत हंगामास शुभेच्व्छा दिल्या.

कार्यक्रमास लातूर पंचायत समीतीचे उपसभापती प्रकाश उपाडे, जिल्हा बँकेचे संभाजी सुळ, संचालीका सौ.स्वयंप्रभा पाटील  शिवकन्या पिंपळे, इंदुताई इगे, चांदपाशा इनामदार,  सचिन दाताळ  संचालक धनराज  देशमुख, संजय हरीदास, संग्राम माटेकर, प्रविण पाटिल, प्रेमनाथ आकणगीरे, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, संचालीका वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, तज्ञ संचालक अनील कुटवाड, माजी संचालक स्नेहलराव देशमुख, पंडीत माने, मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक रनवरे, जागृती कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील देशमुख जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक सी.एन. उगिले रेणा कारखान्याचे खातेप्रमुख, कर्मचारी व शेतकरी सभासदांची सोशल डिस्टन्स पाळुन  उपस्थिती होती.

आभार व्हा.चेअरमन  अनंतराव देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन प्रा सचिन सुर्यवंशी यांनी केले.

Top