Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

एकही अतिवृष्टीग्रस्थ शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचीत राहणार नाही - ना. अमित देशमुख

एकही अतिवृष्टीग्रस्थ शेतकरी शासनाच्या मदती पासून वंचीत राहणार नाही - ना. अमित देशमुख

मदतीची रक्कम विनावीलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी

महसुली पंचनामे गृहीत धरून वीमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या माहितीचे विष्लेषन करून उपाययोजना आखव्यात

सदयस्थितीत पर्यंत मास्क्‍ हीच लस समजून जनतागृती करावी

लातूर : अतीवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्यशासनाने नियम आणि निकषाला अनुसरूनच निधी उपलब्ध करून दिला आहे. या मदती पासून एकही आपद्रग्रस्थ शेतकरी वंचीत राहणार नाही, अनुदानाची ही रक्कम विनाविलंब लातूर जिल्हयातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी असे निर्देश दिले असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा येथे पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

लातूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी निलंगा येथे अतिवृष्टी आणी कोविड१९ आढावा बैठक घेतली. या बैठकी नंतर ते पत्रकाराशी बोलत होते. पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, अतिवृष्टी झाली तेव्हा निलंगा, औसा या तालुक्यासह राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आपण पाहणी केली होती याचा अहवालही राज्यशासनाला दिला होता. महाआघाडीच्या सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज पून्हा या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे झालेले पंचनामे त्यांना मिळणारी मदत आणि त्या सोबतच कोवीड१९ संदर्भाने आज आढावा घेतला आहे. अतिवृष्टी आणि कोरोना महामारी हे नैर्सर्गिक संकट असल्यामुळे त्याचे निवारण करीत असतांना आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नाही याची जाणीव संबंधितांना आपण करून दिली असल्याचे यावेळी म्हटले आहे.

अतिवृष्टी नंतर महसुल तसेच कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यानी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली असून लातूर जिल्हयात ३ लाख ८५ हजार ३९६ शेतकऱ्यांच्या २ लाख ५० हजार ८७ हेंक्टर जमीनीवरील पिके व फळबागाचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार पिकाच्या नुकसानीसाठी प्रती हेक्टरी १० हजार तर फळबागासाठी प्रती हेंक्टरी २५ हजार रूपयाची मदत शासनाने जाहिर केली आहे. त्याच बरोबर जिल्हयात १ हजार हेंक्टर जमीन खरडून वाहून गेली आहे. त्यासाठीही शासनाने मदत मंजूर केली आहे. या मदतीचा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला असून लवकरच वाटप सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाच्या मदती बरोबर शेतकऱ्यांना वीमा कंपनीकडूनही मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानी संदर्भात विमा कंपनीकडे माहिती नोंदवली आहे अशा शेतकऱ्यांनाच मदत करण्याचे विमा कंपनीचे धोरण असले तरी महसुली पंचनामे गृहीत धरून ज्या आपदग्रस्थ शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केला नाही त्यांनाही मदत मिळवुन देण्यासाठी विमा कंपनीकडे आग्रह धरणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.  

लातूर जिल्हयातील कोवीड१९ च्या संदर्भानेही या बैठकीत आढावा घेतला असुन जिल्हयात कोरोना रूग्णाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याचे योवळी सांगण्यात आले आहे. सदयस्थितीत कोरोना महामारी आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी जागतिकस्तरावर कोरोनाची दुसरी-तिसरी लाट आल्याच्या चर्चा होत आहेत. या संदर्भाच्या माहितीचे विष्लेषन करून जिल्हयात प्रतिबंधात्मक आणि खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश आपण संबंधितांना दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात शासनाने योग्य्‍ त्या उपाययोजना केल्या त्याच बरोबर आवश्यक असणाऱ्या सुवीधांची तातडीने उभारणीही केली त्यामुळे जिल्हयातील हे संकट आपण थोपवू शकलो असे सांगून आगामी काळात जो पर्यंत या साथीचे समूळ उच्चाटन झाले आहे असे जाहिर होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसता काम नये अशा सुचना संबंधितांना दिल्या आहेत. कोरोनाची साथ्‍ संपली असा चुकीचा अर्थ काढून काही मंडळी निष्काळजीपणे वागत आहेत. विशेष करून ग्रामीण भागात मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने याकामी जागृतीची मोहिम राबवावी. कोरोनाची लस येई पर्यंत मास्क्‍ हीच लस असल्याची जाणीव जनतेला करून दयावी अश्या सुचनाही केल्या असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.

या आढावा बैठकीस व नंतर पत्रकार परिषदेच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, काँग्रेसचे नेते अभय साळुंखे, निलंगा तालुका काँग्रेसचे  अध्यक्ष विजयकुमार पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाट यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. मोहन डोईबोळे, उपअधिष्ठाता डॉ.उदय मोहिते, उपजिल्हा रुग्णालय निलंगाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सोंदळे, पंचायत समिती निलंगाचे सहाय्यक गटविकास अधिकारी आबासाहेब चव्हाण, अविनाश रेशमे, दिलीप पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी विकास अधिकारी एस.आर.चोले, निलंगा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास मोरे, डॉ.सतीश हरिदास, डॉ. उमेश कानडे, विनायक बगदुरे, सचिन दाताळ, प्रदीपसिंह गंगणे, प्रवीण सूर्यवंशी, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, महेश देशमुख, शिराज देशमुख, प्रमोद मरुरे, दयानंद चोपणे, लाला पटेल, सुधाकर पाटील आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Top