Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

अज्ञात आजाराने कोंबडया दगावल्याने प्रभावित परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

अज्ञात आजाराने कोंबडया दगावल्याने प्रभावित परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई

आजारांचे निदान अहवाल होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा/ प्रदर्शन ईत्यादी बाबी बंद ठेवण्याचे आदेश

लातूर (जिमाका) : मौ. सुकणी, मौ. वंजारवाडी ता.उदगीर येथे अज्ञात आजाराने कोंबडया दगावल्याचे आढळून आले असून मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने व सबब कोंबडयांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत (Inconclusive) असल्याने सबब रोगाचा प्रसार जिल्हयात ईतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील तरतुदीनुसार मौ. सुकणी, मौ. वंजारवाडी ता. उदगीर जिल्हा लातूर येथे सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी मौ. सुकणी, मौ. वंजारवाडी ता. उदगीर येथील 10 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र सतर्क झोन (Alert Zone) म्हणून घोषीत करुन केले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पृथ्वीराज बी.पी. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 prevcntion and Control of Infectious and Contagious Diseases in Animals Act 2009) व Action Plan for prevention control containment of avian influenza (Revised 2021) मधील तरतुदीनुसार मौ. सुकणी, मौ. वंजारवाडी ता. उदगीर येथील 10 कि.मी. त्रिज्येतील (within radious of 10 KM) क्षेत्र सतर्क झोन (Alert Zone) म्हणून घोषीत करुन खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात येत असून आणि त्या ठिकाणची खाजगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखादय, अनुषंगिक साहित्य व उपकरणे ईत्यादी च्या वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर 2 टक्के सोडियम हायड्रोक्साईड किंवा पोटॅशियम परमेंग्नेटने (2% NaOH / KMnO4) निर्जतुकीकरण करावे.

प्रभावित पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांसंबंधीच्या सर्व नोंदी व्यवस्थित ठेवण्याबाबत विशेष दक्षता घ्यावी. प्रभावित क्षेत्राच्या 5 कि.मी. त्रिज्येतील (Within raious of 5 KM) परिसरात प्रभावित पक्ष्यांच्या आजारांचे निदान अहवाल (Test results) प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने, वाहतूक, बाजार व यात्रा/ प्रदर्शन ईत्यादी बाबी बंद राहतील. असेही आदेशात नमुद केले आहे.

Top