Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

लातुरातील विभागीय विज्ञान केंद्राची १२ एकरांत होणार उभारणी

लातुरातील विभागीय विज्ञान केंद्राची १२ एकरांत होणार उभारणी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री निलंगेकरांनी मानले आभार

लातूर : मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील दुसरे विभागीय विज्ञान केंद्र लातुरात उभारण्याची मान्यता यापूर्वी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली होती. या विभागीय विज्ञान केंद्रास लातूरमधील विस्तारीत औद्योगिक वसाहतीत जागा प्राप्त व्हावी, असा प्रस्ताव राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली असून सदर विभागीय विज्ञान केंद्रात १२ एकर जागा उपलब्ध होणार आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी सदर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उद्योगमंत्री देसाई यांचे आभार मानले आहेत. लवकरच या विज्ञान केंद्राच्या उभारण्याच्या कामास सुरुवात होईल, अशी ग्वाही पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली आहे. सदर विज्ञान केंद्र इस्त्रोच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार असून याकरीता केंद्र सरकारचा निधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री निलंगेकर यांनी दिली आहे. 

शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभराला परिचत असून राज्यासह देशातील कानाकोपर्यात राहणारे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रासह लातूरचे वैद्यकीय क्षेत्रही मोठ्या नावारुपाला येत आहे. येथील शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्र प्रगत होत असून याला विज्ञानासह संशोधनाची जोड मिळणे गरजेचे होते. हि बाब पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निर्दशनास आली. त्यामुळेच पालकमंत्री निलंगेकरांनी लातूरातील विस्तारीत औद्योगिक वसाहतीत विभागीय विज्ञान केंद्र उभारले जावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत पालकमंत्री निलंगेकर सातत्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते. या पाठपुराव्यास यश आलेले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुचनेवरुन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व पालकमंत्री निलंगेकर यांच्यात सदर विज्ञान केंद्र उभारणीसाठी विस्तारीत औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. 

याबाबत पालकमंत्री निलंगेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लातुरात विभागीय विज्ञान केंद्र उभारण्यासाठी विस्तारीत औद्योगिक वसाहतीत १२ एकर जागा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. 

मराठवाड्यात प्रथमच उभारला जाणारे हे विभागीय विज्ञान केंद्र भव्य राहणार असून यामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या विभागीय विज्ञान केंद्रास तारंगण, विज्ञान उद्यान, वैज्ञानीक प्रदर्शन भरवण्यासाठी गॅलरी, थ्रिडी थिएटर त्याचबरोबर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. या विभागीय विज्ञान केंद्रामुळे लातूरात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी मोठी उपलब्धता होणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राच्या द़ृष्टीकोनातून संशोधनाला मदत मिळणार आहे.  सदर जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांचे समस्त लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले.

Top