Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

दत्तात्रय परळकर यांची प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

दत्तात्रय परळकर यांची प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

प्रतिवीर पत्रकार कर्मचारी सहकारी पतसंस्थेची घटस्थापनेच्या मुहूर्तावर स्थापना

सोलापूर (प्रतिनिधी)  : येथील दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या पत्रकार व कर्मचारी यांच्यासाठी प्रतिवीर पत्रकार व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून या संस्थेच्या अध्यक्षपदी संपादक चंद्रशेखर लालप्पा गायकवाड यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. तसेच सचिव म्हणून मारुती दत्तात्रय गवळी तर ज्येष्ठ संचालक म्हणून प्रदीप देविदासराव कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर विलास चांगदेव मस्के, गजानन संजय जोशी, संदीप विठ्ठल विदुर, अनंत उत्तमराव साखरे, धनंजय देविदास घोगरे, दत्तात्रय गणपतराव परळकर यांची संचालक म्हणून कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.

सोलापूर येथील दैनिक प्रतिविर या वृत्तपत्राच्या सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, औरंगाबाद, नांदेड, अमदनगर या शहरातून स्वतंत्ररीत्या आवृत्त्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. या सर्व आवृत्यात काम करणार्‍या पत्रकार व कर्मचार्‍यांसाठी ही पतसंस्था स्थापन करण्यात आली आहे. पत्रकार व कर्मचारी यांना आर्थिक अडचणीच्या वेळेस मुलांच्या शैक्षणिक व आरोग्याचा अडचणीच्या वेळी मदत करणे यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली असल्याचे दैनिक प्रतिविरचे संपादक तथा या संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन चंद्रशेखर गायकवाड यांनी सांगितले.

Top