Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मिठाई बॉक्सवर उत्पादनाची मुदत नमुद करावी

मिठाई बॉक्सवर उत्पादनाची मुदत नमुद करावी

लातूर (जिमाका) : जिल्हयातील सर्व मिठाई / विक्रेत्यांनी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या मिठाई व इतर तत्सम खाद्यपदार्थाच्या टेवर, बॉक्सवर ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा प्रकारे त्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनाचा दिनांक व कधीपर्यंत वापरता येईल, हे स्पष्टपणे दर्शवावे. मावा, मिठाई हे दर्जेदार, गुणवत्तापुर्ण व स्वच्छ वातावरणात तयार करुन विक्री करावी. असे सहाय्यक आयुक्त (अन्न) तु.चं. बोराळकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी डी.व्ही. पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी वि.स. लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

कोणत्याही परिस्थितीत मुदतबाह्य / शिळया मिठाईची विक्री करु नये असे आढळल्यास संबंधिताविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे ही सहाय्यक आयुक्त (अन्न) तु.चं. बोराळकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी डी.व्ही. पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी वि.स. लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Top