Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

विमा संरक्षित पिकाचे काढणी पश्चात नुकसान झाल्यास विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन

विमा संरक्षित पिकाचे काढणी पश्चात नुकसान झाल्यास विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन

लातूर (जिमाका) : जिल्हयामध्ये मागील तीन दिवसापासून सर्वदूर पाऊस होत आहे. सध्या खरीप पिकांची काढणी अंतिम टप्यात असून काही पिके शेतात उभी आहेत. काही शेतकऱ्यांनी काढणी केलेले पिके वाळवण्यासाठी शेतामध्ये तसेच ठेवलेले आहेत. अशा अधिसुचित पिकांचे गारपीठ, चक्री वादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पाऊस यापैकी कोणत्याही बाबीमूळे पिक कापणी करुन सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई दिली जाते. ज्या शेतकऱ्यांचे काढणी पश्चात नूकसान झालेले आहे. यांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची माहिती नोदवावी व अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधी/ तालूका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषि अधिकारी दत्तात्राय गावसाने यानी केले आहे.

यासाठी शेतऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती सर्व प्रथम प्राधान्याने Crop Insurance मोबाईल ॲपद्वारे देण्यात यावी. जेणेकरुन शेतकऱ्यांना व्यक्तीश: अर्ज कागदपत्रे द्यावे लागणार नाहीत व कार्यालया समोरील संभाव्या गर्दी होणार नाही.

ॲपद्वारे दिलेल्या अर्जाची पूष्टी करुन संबंधीत शेतऱ्यांना मोबाईलद्वारे डॉकेट आय.डी.मिळेल ज्याद्वारे शेतकऱ्यांना अर्जाची सद्यस्थिती ॲपद्वारेच पाहता येईल. मोबाईल ॲपद्वारे शक्य न झाल्यस भारतीय कृषी विमा कंपनीच्या 18004195004 या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्यात यावी अथवा सदर आपत्तीची माहिती बँक/कृषि विभाग/ महसूल विभाग यांना देण्यात यावी. सदरची माहिती बँक/संबंधीत विभागाकडून विमा कंपनीस तात्काळ पुढील 48 तासात पाठवण्यात येईल.

Crop Insurance मोबाईल ॲप Google Play Store वर उपलब्ध असून मराठी भाषेमध्ये माहिती भरता येणे शक्य असल्याने ज्या शेतकऱ्यांचे काढणी पश्चात नूकसान झालेले आहे. यांनी प्राधान्याने ॲपद्वारे नुकसानीची माहिती नोदवावी व अधिक माहितीसाठी विमा कंपनी प्रतिनिधी/ तालूका कृषि अधिकारी यांचेकडे संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषि अधिकारी दत्तात्राय गावसाने यानी केले आहे.

Top