Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

लातूर (जिमाका) : कोषागार कार्यालय, लातूर अंतर्गत निवृत्ती वेतन/कुटूंब निवृत्ती वेतन आहरित करीत असलेल्या सर्व निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी दिनांक 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला, दिनांक 1 नोव्हेंबर पासून दिनांक 30 नोव्हेबर पर्यंत निवृत्ती वेतन संवितरण प्राधिकाऱ्यास सादर करावा लागतो. कोवीड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता, राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असे जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

हयातीचा दाखला मुख्यत: संबंधीत निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात त्या बँकेमार्फत संबंधीत कोषागारत सादर केला जातो. त्या अनुषंगाने या लातूर कोषागाराअंतर्गत निवृत्ती वेतन आहरीत करीत असलेल्या सर्व निवृत्ती वेतन/कुटूंब निवृत्ती वेतनधारकांच्या नावांच्या याद्या संबंधीत बँकांकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत.

शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे कोवीड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता, राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ज्यांचे वय दि. 1 ऑक्टोबर, 20 रोजी 80 वर्षे पूर्ण होत आहे, अशा निवृत्तीवेतन धारकांना दि. 1 ऑक्टोबर, 2020 ते दि.30 डिसेंबर, 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर करता येईल. हा आदेश अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे आणि जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील असे शासन आदेशात नमुद केले आहे. जिल्हयातील सर्व निवृत्ती वेतन धारकांनी उपरोक्त शासन सूचनांची नोंद घेऊन हयातीचा दाखला मुदतीत सादर करण्याबाबत दक्षता घ्यावी. असे जिल्हा कोषागार अधिकारी राधाकिसन राऊत यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Top