Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

बागायतदारांनी निर्यातक्षम द्राक्ष बागाची 29 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी

बागायतदारांनी निर्यातक्षम द्राक्ष बागाची 29 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन नोंदणी करावी

लातूर (जिमाका) : सन 2020-21 मध्ये युरोपीयन युनियन आणि ईतर देशांना निर्यात करण्यासाठी नोंदणी बंधनकारक करण्यात आलेली असल्याने किटकनाशक उर्वरीत अंश आणि किड रोगाची हमी देण्यासाठी ग्रेपनेट द्वारे द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात येत आहे. सन 2020-21 वर्षामध्ये युरोपीयन आणि ईतर देशाना द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोदंणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. जिल्हयातील जास्ती जास्त शेतकऱ्यांनी निर्यातीच्या दृष्टीने बागाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

अपेडाच्या मार्गदर्शनाखाली द्राक्ष पिकाची नोंदणी करणेसाठी ग्रेपनेट प्रणालीद्वारे सुवधिा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सर्व द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी सन 2020-21 करीता नोंदणी करण्यासाठी कृषि विभागाच्या कृषि सहाय्यक/कृषि पर्येवक्षक/ कृषि अधिकारी/ तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधून त्वरीत अर्ज करावेत. ग्रेपनेट द्वारे नोंदणी करण्याची अंतीम मुदत 29 नोंव्हेबर 2020 असून विहीत मुदतीमध्ये अर्ज करुन नोंदणी करुन घेण्यात यावी. लातूर जिल्यातून उत्पादीत होणऱ्या द्राक्षांना विदेशातून विशेष मागणी आहे.

जिल्हयातील जास्ती जास्त शेतकऱ्यांनी निर्यातीच्या दृष्टीने बागाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

Top