Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना सांड्याचे वाटप

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना सांड्याचे वाटप

लातूर : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवामोर्चा लातूर शहरच्यावतीने शहरातील गंजगोलाईतील अंबिका देवीच्या मंदिरात नवरात्र महोत्सवानिमीत्त आरतीच्यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गरजू महिलांना सांड्यांचे वाटप करण्यात आले.

भाजपायुवा मोर्च्याचे पदाधिकारी संतोष मदने यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, अमोल गिते, सागर घोडके, उपाध्यक्ष वैभव डोंगरे, गजेंद्र बोकन, मंडळाध्यक्ष रवी लवटे, काकासाहेब चौगुले, विद्यार्थी आघाडी प्रमुख श्रीकांत भराडीया, युवती प्रमूख प्रा.पुनम पांचाळ, अजय भुमकर, करण हाके, महादेव पिटले, संतोष तिवारी, चैतन्य फिस्के, शैलेश बिराजदार, पृथ्वीराज कुरे पाटील, ऋषीकेष क्षीरसागर, अभिजित मदने, रामलिंग मदने, प्रसाद लोकरे, ओम शिंदे, राजेश पवार, कुलभुषण उदगीरकर यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Top