Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत

लातूर (जिमाका) : महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्या. यांनी मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजने अंतर्गत अर्ज स्वीकारण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. लातूर जिल्हयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. यांनी पूढील प्रमाणे ऑनलाईन पोर्टलवर लिंक उपलब्ध् करुन दिलेले आहे. तसेच मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजने बाबत आणखी काही माहिती आवश्यक असेल तर अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. शाहू चौक, लातूर या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण एस.एन.चिकुर्ते यांनी केले आहे.

लातूर जिल्हयातीलअनुसूचित जातीच्या प्रवर्गातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलव्दारे अर्ज करावे असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण एस.एन.चिकुर्ते यांनी केले आहे.

Top