Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

लातूर (जिमाका) : राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेबाबत सन 2020-21 मध्ये भाजीपाला पिकाची दर्जेदार व किडरोगमुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे तसेच रोपवाटीकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध् करुन देणे, पिक रचनेत बदल घडवून आणने व नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करण्यासाठी सदरील योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. अधिक माहितीसाठी संबंधीत तालूका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

या रोपवाटीकेची उभारणी करावयाचे घटक व प्रति लाभार्थी महत्तम अर्थसहाय्याचे स्वरुप पूढीलप्रमाणे आहे. घटक- 3.25 मी.उंचीचे फ्लट टाईप शेडनेट गृह (सांगडा उभारणी ),क्षेत्र संख्या- 1000 चौ.मी., मापदंड रु.- 380 प्रति चौ.मी., प्रकल्प खर्च- 3 लाख 80 हजार, अनुदान रक्कम रु.- 1 लाख 90 हजार, घटक-प्लास्टिक टनेल क्षेत्र/संख्या- 1000 चौ.मी., मापदंड रु.-60 प्रति चौ.मी. प्रकल्प खर्च-60 हजार, अनुदान रक्कम रु.-30 हजार, घटक-पॉवर नॅपसॅक स्प्रेअर क्षेत्र/संख्या-1, मापदंड रु.-7 हजार 600, प्रकल्प खर्च-7 हजार 600, अनुदान रक्कम रु.-3 हजार 800, घटक- प्लॅस्टिक क्रेटस, क्षेत्र /संख्या-62, मापदंड रु.- 200, प्रकल्प खर्च-12 हजार 400, अनुदान रक्कम रु.-6 हजार 200, एकूण प्रकल्प खर्च 4 लाख 60 हजार, अनुदान रक्कम रु.-2 लाख 30 हजार. सदर योजना प्रकल्प स्वरुपात राबवायची असल्याने उपरोक्त चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक राहील.

इच्छुक शेतकऱ्यांनी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेत अर्ज करण्यासाठी Maha DBT या संकेत स्थळावर ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याकडे वाढीव कालमर्यादेप्रमाणे दिनांक 02 नोव्हेंबर 2020 पर्यंत करावेत. अर्जासोबत 7/12, 8 अ, स्थळदर्शक नकाशा, चतु:सिमा, संवर्ग प्रमाणपत्र, कृषि पदवी बाबतचे कागदपत्रे, महिला शेतकरी गट असल्यास त्याचे नोंदणी पत्र, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्स प्रत जोडावी. अधिक माहितीसाठी संबंधीत तालूका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

Top