Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनासाठी ऑन लाईन अर्ज करावेत - विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनासाठी ऑन लाईन अर्ज करावेत - विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

लातूर (जिमाका) : जिल्हयातील माजी सैनिक / माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी पंतप्रधान शिष्यवृत्ती 2020-21 साठी ज्यांचे पाल्य 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक गुण घेवून पास झाले आहेत व वैद्यकीय, अभियांत्रीकी, बी. सी.ए, बी.बी. ए. बी फॉर्म, बी.एड, एल.एल.बी. व एम फॉर्म (सर्व व्यावसायिक शिक्षण ) मध्ये शिक्षण घेत आहेत अशा पाल्याचे अर्ज ऑन लाईन (On Line) दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत www.ksb.gov.in या वेबसाईटवर, केंद्रिय सैनिक बोर्ड न्यु दिल्ली यांना भरणे जरुरी आहे व अर्जाची प्रत व इतर कागदपत्रे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लातूर येथे सादर करावेत.

अर्ज फॉर्म व इतर माहिती www.ksb.gov.in या वेब साईटवर उपलब्ध् करुन दिलेली आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Top