Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला

दोन दरवाज्यातून 766 क्युसेक विसर्ग चालू

लातूर : जिल्हातील निम्न तेरणा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असुन प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दोन दरवाज्यातून 766 क्युसेक विसर्ग नदी पात्रात चालू आहे. शुक्रवार रोजी प्रकल्पाचे उप विभागीय अधिकारी एस. जी. कोन्गे, सोबत अभि. नितीन पाटील, के. आर. येणगे (तेरणा प्रकल्पाचे शाखाधिकारी) यांनी संपुर्ण प्रकल्पाची पाहणी व तपासणी केली. यावेळी कार्यरत पोलीस यंत्रणेचे कर्मचारी व धरण शाखेची सर्व कर्मचारी हजर होते.

जिल्हातील निम्न तेरणा प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असुन सध्या या प्रकल्पांचे दोन द्वारातून  766 क्युसेक एवढा विसर्ग नदीपात्रात चालू आहे, तसेच प्रकल्प पुर्ण सुरक्षित आहे असल्याची माहिती प्रकल्पाचे उप विभागीय अधिकारी एस. जी. कोन्गे यांनी दिली आहे.

Top