Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

शेती कायद्यासंदर्भात मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे व्याख्यान

शेती कायद्यासंदर्भात मा..शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे व्याख्यान

लातूर : भाजपा नेते तथा माजी . कृषी अभ्यासक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे शेती कायद्यासंदर्भातनवीन कृषी धोरण शेतकरी देशाच्या हिताचेया विषयावर व्याख्यान गुरूवारी दि. 29 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज सभागृह, एम.आय.डी.सी.कळंब रोड, लातूर येथे ठेवण्यात आलेले आहे. या व्याख्याणास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, मंडळाध्यक्ष ज्योतीराम चिवडे यांनी केले आहे.  

केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांला आर्थिक सुबकता स्थिरता निर्माण करून देण्यासाठी विविध कृषी कायदे केले. या संदर्भात पी.व्ही.नरसिंगराव यांच्या कार्यकाळात मुक् अर्थव्यवस्थेचा स्वीकार पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंगजी यांच्या कार्यकाळात मॉडल ॲक्ट  शेतीमाल फळे, मार्केट यार्ड बाहेर विकण्याचे धोरण राबविण्याचा विश्वास काँग्रेस पक्षाच्या लोकसभा जाहीरनाम्यात दिलेला होता. असे असतानाही राजकारणासाठी कृषी कायद्याला विरोध करून गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे या कायद्यासंदर्भातील सत्य माहिती जनतेला, शेतकर्याला, कार्यकर्त्याला देण्याच्या सुचना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा साहेब केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळेनवीन कृषी धोरण शेतकरी देशाच्या हिताचेया विषयावर भाजपा नेते तथा माजी . कृषी अभ्यासक शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे व्याख्यान 29 ऑक्टोबर 2020 रोजी गुरूवारी सकाळी 10.30 वा. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक कॉलेज सभागृह, एम.आय.डी.सी.कळंब रोड,लातूर येथे ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या व्याख्याणास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लातूर शहर जिल्हा भाजपा अध्यक्ष गुरूनाथ मगे, शहर संघटक सरचिटणीस मनिष बंडेवार, भाजपा युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, मंडळाध्यक्ष ज्योतीराम चिवडे यांनी केले आहे.  

Top