Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मनपाच्या कोविड केअर सेंटरमुळे लातूरकरांचे वाचले १२ कोटी

मनपाच्या कोविड केअर सेंटरमुळे लातूरकरांचे वाचले १२ कोटी  

तीन कोविड केअर केंद्रामधून ३९१० रुग्णांवर उपचार 

महापौर, उपमहापौर, आयुक्तांनी मानले मनपा आरोग्य सेवकांचे आभार

लातूर : कोरोना संकटकाळात शहरातील नागरिकांना मोफत उपचार देण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरात तीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली होती. या सेंटरमध्ये एकाच वेळी ७५० रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध होती.३९१० रुग्णांनी या केंद्रातून उपचार घेतले. यामुळे लातूरकर जनतेचे १२ कोटी १३ लक्ष ५० हजार रुपये वाचले आहेत. याबाबतची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

मनपाच्या पुढाकाराने राबविलेला उपक्रम लातूरकर जनतेला संजीवनी देणारा ठरला.

कोरोना काळात सर्वत्र भीतीदायक वातावरण होते. आजाराचे स्वरूप माहित नव्हते, रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरही ताण होता. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने कव्हा रस्त्यावरील समाज कल्याण वसतिगृह, औसा रस्त्यावर पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन वसतिगृह आणि बार्शी रस्त्यावर बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय या तीन ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले होते. प्रत्येक केंद्रात २५० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था होती.v५० खाटांना ऑक्सिजन सुविधाही देण्यात आली होती.

कोरोना काळात एकूण हजार ९१० रुग्ण या तीन केंद्रात दाखल झाले. त्यापैकी २४२७  रुग्ण १० दिवस उपचार घेऊन पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. शहरातील ७१९ रुग्णांनी गृह विलगीकरणात उपचार घेतले तर ६४९ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र पाठविण्यात आले.

शासकीय नियम आणि दर पत्रकानुसार एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाने खाजगी रुग्णालयात विना ऑक्सिजन उपचार घेतल्यास प्रति दिवस हजार रुपये दर आकारण्यात येत होता. याशिवाय औषधी, डॉक्टरांसाठी पीपीई कीट,जेवण, विविध तपासण्या यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागत होते. हा सर्व खर्च हजारोच्या घरात जात होता. अशा काळात महानगरपालिकेने मात्र या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.

महापौर, उपमहापौरांनी दिले जातीने लक्ष

महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर मधील सर्व सुविधा व्यवस्थित कार्यरत रहाव्यात आणि नागरिक रुग्णांची कसलीही गैरसोय होऊ नये यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे या केंद्रांना सातत्याने भेटी देत असल्याचे दिसून आले. अनेकदा त्यांनी थेट रुग्णाच्या खोलीत जाऊन त्याची विचारपूस करत मानसिक आधार दिल्याचेही पाहण्यात आले.उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनीदेखील तीनही केंद्रांना वारंवार भेटी दिल्या.

 

ज्या काळात खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर उपचार केले जात नव्हते त्यावेळी महानगरपालिकेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय मनपाने घेतला होताहा निर्णय लातूरकरांना संजीवनी देणारा ठरला. या केंद्रात रुग्णास राहण्याची सोय, औषधी, दोन वेळचे भोजन, नाश्ता काढा देण्यात येत होता. रक्त तपासणी मोफत करण्यात येत होती. परिसराच्या स्वच्छतेसह रुग्णांना दररोज योगासने एरोबिक्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. ही केंद्र कार्यरत होण्यापूर्वी याच ठिकाणी नागरिकांसाठी विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. हजारो नागरिकांनी या सुविधेचाही लाभ घेतला.

एकही दिवस रजा न घेता मनपा आरोग्य सेवकांनी बजावले कर्तव्य

अगदी सुरुवातीच्या टप्प्यात खाजगी अथवा शासकीय रुग्णालयात कर्मचारी उपलब्ध होत नव्हते.त्या काळापासून महानगरपालिकेच्या आरोग्य सेवकांनी पुढे येत सेवा बजावली. यादरम्यान त्यांनी एकही दिवस रजा घेतली नाही. रुग्णांच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची लागणही झाली. तरीदेखील उपचारानंतर ते पुन्हा सेवेत दाखल झाले. काहीवेळा तर आरोग्य सेवकांना सलग ४८ तास काम करावे लागले. त्यांच्या या सेवेकरिता शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, आयुक्त देविदास टेकाळे यांनी कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Top