Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

शैक्षणिक फिस बाबत मनमानी करणाऱ्या शाळांवर कार्यवाही करा अन्यथा रस्त्यांवर उतरु - काँग्रेस सेवादलाचा इशारा

शैक्षणिक फिस बाबत मनमानी करणाऱ्या शाळांवर कार्यवाही करा अन्यथा रस्त्यांवर उतरु - काँग्रेस सेवादलाचा इशारा

लातुर : संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या कोरोना मुळे सर्वच पालकांची आर्थिक कोंडी झाली असून शाळा ही पूर्ण बंद असून केवळ 3/4 क्लास ऑनलाइन घेतले जात आहेत. अशा अडचणीच्या वेळी शाळा प्रशासनाने माणुसकीची भावना दाखवुन शैक्षणिक शुल्कात 50 टक्के कपात करावी व पालकांना दिलासा दयावा अशी मागणी काँग्रेस सेवादलाच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक यांची भेट घेऊन निवेदद्वारे केली आहे. 7 दिवसात सकारात्मक निर्णय नाही झाल्यास काँग्रेस सेवादल पालकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष बिरबल देवकते, शहर जिल्हाध्यक्ष सुपर्ण जगताप, जिल्हाउपाध्यक्ष बलीभाऊ शिरसाठ, सोशल मीडिया प्रमुख प्रा.एम.पी. देशमुख, यांग ब्रिगेड कार्याध्यक्ष मूनवर शेख, योगेश वाघमारे, यांच्यासह सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Top