Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनची लातूर जिल्ह्याकरीता ३५०० झाडांची भेट

महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनची लातूर जिल्ह्याकरीता ३५०० झाडांची भेट

ग्रीन लातूर वृक्ष टिमच्या कार्याची घेतली दखल

लातूर : सतत दुष्काळ ग्रस्त जिल्हा म्हणुन ओळखला जाणारा, कधी अवर्षन तर कधी अतिवृष्टी याबरोबरच मराठवाड्यात सर्वात कमी वनक्षेत्र असलेला भाग म्हणुन लातूर जिल्हा ओळखला जातो. लातूर वृक्ष च्या ग्रीन लातूर वृक्ष टिमने जिल्ह्यातील वनक्षेत्र, झाडांचे प्रमाण वाढविण्याकरीता अविरत कार्य सुरु केलेले आहे. याकार्याची दखल घेउन महाराष्ट्र नर्सरी असोसिएशन तर्फे लातूर परिसरात लावण्याकरीता ३५०० पर्यावरण पुरक झाडे पाठविली आहेत. महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे पदाधिकारी व संगम हायटेक नर्सरीचे संगमेश्वर बोमणे यांनी ही झाडे ग्रीन लातूर वृक्ष टिमकरीता मिळवून देण्याकरीता विशेष प्रयत्न केले. अशी माहिती डॉ. पवन लड्डा यांनी दिली.

महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनने पाठवलेल्या झाडांमध्ये कडुनिंब, कासीस, वड, पिंपळ, बहावा, आकाशमोगरा यासारखी झाडे व फणस, पेरु, सिताफळ अशी फळझाडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनने झाडांची भेट देवुन ग्रीन लातूर वृक्ष चळवळीला सन्मानीत केले असुन यामुळे अधिक काम करण्याची उर्जा व प्रेरणा मिळाली असल्याचे सांगुन ग्रीन लातूर वृक्ष टिमतर्फे डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद यांनी महाराष्ट्र नर्सरी असोसिएशनचे अध्यक्ष जोगदंद यांचे आभार व्यक्त केले.

हा उपक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिमचे समन्वयक डॉ. पवन लड्डा, मनपा लातूर नगरसेवक इम्रान सय्यद, पुजा निचळे, मोईझ मिर्झा, प्रमोद निपानीकर, ऋषीकेश दरेकर, रुषीकेश पोद्दार, मनमोहन डागा, ॲड. सर्फराज पठाण, सार्थक शिंदे, प्रसाद शिंदे, स्वाती यादव, सुलेखा कारेपुरकर, शैलेश सुर्यवंशी, डी.एम.पाटिल, आनंद सुर्यवंशी, महेश कदम, प्रसाद श्रीमंगले, महेश भोकरे, महेश गेलडा, खंडेराव गंगणे, अरविंद फड, वंजारे कृष्णा, राहुल कुचेकर, शिवशंकर सुफलकर, विष्णु चव्हाण, गोविंद शिंदे, मंगेश शिंदे, भुषण पाटिल, यश, नितीन, करण कांबळे, संघपाल साळवे यांनी परिश्रम घेतले.

Top