Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

महात्मा बसवेश्वर मंडल भाजपाची नुतन कार्यकरणी जाहीर

महात्मा बसवेश्वर मंडल भाजपाची नुतन कार्यकरणी जाहीर

लातूर : महात्मा बसवेश्वर मंडलाच्यावतीने दत्त मंदिर देवस्थानच्या प्रांगणामध्ये लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर मंडलाच्या नुतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. यावेळी नुतन कार्यकारिणी सदस्यांना गुरुनाथ मगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व भारत मातेची पतिमा देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी लातूर शहर युवा मोर्चा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, चिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, उपाध्यक्ष तुकाराम गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महात्मा बसवेश्वर मंडलाच्या नूतन कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी संगम कोटलवार, प्रशांत डोके, महेश बरगले, बसवराज सुलगुडले, शाम पवार, लता घायाळ, सरचिटणीसपदी बाळासाहेब शिंदे, दत्ता बोरुळे. चिटणीसपदी आकाश बजाज, बालाजी उजने, शिवाजी पाटील, सौ.सविता गायकवाड, सौ.आफ्रीन खान, नागनाथ स्वामी, ओम खुबा. कोषाध्यक्षपदी संजय कदम, प्रसिद्धी प्रमुखपदी रवींद्र जगदाळे, कार्यालय प्रमुखपदी बालाजी खमामे, मंडल युवा मोर्चा अध्यक्ष राजेश पवार, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.शितल कुलकर्णी, अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष गौस शेख, अनुसूचित जाति मोर्चा अध्यक्ष नागेश जाधव, ओबीसी मोर्चा अध्यक्ष उत्तम सूर्यवंशी यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान बालाजी गाडेकर यांनी अध्यात्मिक आघाडी तसेच कमलाकर डोके यांनी कामगार आघाडी यांच्या नूतन पदाधिकार्यांची यादी जाहीर केली. सर्व नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी माजी सैनिक मेजर सुभेदार प्रशांत डोके यांचा जाहीर पक्ष प्रवेश गुरुनाथजी मगे भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत झाला.

या कार्यक्रमास युवा मोर्चा अध्यक्ष लातूर शहर जिल्हा तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी बैठकीस मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना गुरुनाथ मगे यांनी जिल्हा हा कार्यकारिणी व मंडल कार्यकारिणीतील नूतन पदाधिकार्यांना एकनिष्ठेने पार्टीची, जनतेची व भारत मातेची सेवा करण्याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास धनंजय हाके, भालचंद्र दानाई, कमलाकर डोके, बालाजी गाडेकर, महिला मोर्चा अध्यक्ष मीनाताई भोसले, मंडल अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, सतीश ठाकूर, प्रवीण घोरपडे, ललित तोष्णीवाल, रवी सुडे, महाराष्ट्र प्रदेश युवा चिटणीस दत्ता चेवले, किसान मोर्चा अध्यक्ष सौदागर पवार, सतीश माने, लातूर शहर जिल्हा युवती महिला मोर्चा अध्यक्ष पुनम पांचाळ, दिव्यांग सेलच्या ज्योती मार्कंडे, मिडिया संयोजक विपूल गोजमगुंडे, धनश्री घोडके, शोभा कोंडेकर, अॅ्ड.विजय अवचारे, मुन्ना हाश्मी, देवा गडदे तसेच महात्मा बसेश्वर मंडलाचे अध्यक्ष संजय गिर व कार्यकारिणीतील पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top