Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

लिंगायत समाजाने सकारात्मक विचार करून एकसंघ बनावे - प्रा.बी.व्ही.मोतीपवळे

लिंगायत समाजाने सकारात्मक विचार करून एकसंघ बनावे - प्रा.बी.व्ही.मोतीपवळे

लातूर : लिंगायत समाजाने सकारात्मक विचार करून एकसंघ बनून समाजाचा विकास करावा असे मत दै. यशवंतचे संपादक अॅड.प्रा.बी.व्ही. मोतीपवळे यांनी लिंगायत महासंघाच्या वधू-वर परिचय पुस्तक प्रकाशन व समाजातील काही गुणवान व्यक्तींना जीवन गौरव व समाजभुषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलतांना मांडले.

लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या नेतृत्वाखाली ऑनलाईन वधू-वरांची नाव नोंदणी करण्यात आली होती. या वधू-वर नाव नोंदणीच्या पुस्तकाचे प्रकाशन आज सुतमील कम्पाऊंडमधील ज्ञानदीप क्लासेस हॉल लातूर येथे प्रा.बी.व्ही.मोतीपवळे सरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वधू-वर मेळावा व वधू-वर पुस्तक हे पालकांना मार्गदर्शन करतात. प्रा.सुदर्शन बिरादार हे कल्पक पध्दतीने अशी कामे करतात. त्याच्या अनेक सामाजिक कार्यातील वधू-वर मेळावा हे कार्य आहे असे ते आपल्या भाषणातून मत मांडले.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळ यांनी मार्गदर्शन करतांना लिंगायत महासंघ या संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूरचे सभापती शिवानंद हेंगणे, डॉ.राजेश्वर पाटील, प्राचार्य चंद्रशेखर भोगडे, अॅड.मधुकर राजमाने व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांची भाषणे झाली. यावेळी अॅड.गुणवंतराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार तर बसवराज मंगरुळे डॉ.निलेश मजगे, डॉ.अण्णासाहेब बिराजदार, डॉ.संजय शेळके, इंजि.विजय आवाळे, डॉ.बस्वराज नागोबा, बालाजी पाटील चाकूरकर, महेश तोंडारे, मनोज स्वामी, शिवानंद हेंगणे, भाऊसाहेब मुरगे, तानाजी सोनटक्के, शिवाजी स्वामी, कपिल बिराजदार, विठ्ठलराव खरपडे आदिंना समाजभुषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यावेळी जिल्हा संघटक नागनाथअप्पा भूरके, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, माणिक कोकणे, विजयकुमार कुंडूंबले, वैजनाथ जट्टे, मनोज पोतदार, किशन कोलते, सुभाष शेरे, रमेश वेरूळे, सिद्रामप्पा पोपडे, विश्वनाथ मिटकरी, माणिक मरळे, शिवाजी मुळे, जयराज बेलुरे, सुभाष शंकरे, पटणे सर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत भाषण जिल्हाध्यक्ष डॉ.काशिनाथ राजे, तर जी.जी. ब्रम्हवाले यांनी प्रास्ताविक केले तर आभार तुकाराम कावळे यांनी मानले.

Top