Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

नगर पंचायत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात पदवीरधर मतदार संघाचे निवडणुकीमुळे अंशत: बदल

नगर पंचायत प्रभाग रचनेच्या कार्यक्रमात पदवीरधर मतदार संघाचे निवडणुकीमुळे अंशत: बदल

लातूर (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 12 ऑक्टोबर 2020 च्या पत्रान्वये लातूर जिल्हयातील चाकूर, जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ या चार नगर पंचायतीचा प्रारुप प्रभाग रचना तयार करणे ते अंतीम प्रभाग रचना तयार करणेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तथापी सध्या राज्यात पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया चालू असल्याने व मतदान दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी व मतमोजणी दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी असल्याने राज्य निवडणूक आयोगाने नगर पंचायत प्रभाग रचना कार्यक्रमात दिनांक 13 नोव्हेंबर 2020 च्या पत्रान्वये बदल केला आहे. या चारही नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

यामध्ये प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्दीची तारीख दिनांक 18 नोव्हेंबर 2020 व त्यावर आक्षेप व हरकती दाखल करणे दिनांक 18 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 26 नोव्हेंबर 2020 यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र प्राप्त हरकती व सुचनावर सुनावणी घेण्याची मुदत दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत होती ती दिनांक 10 डिसेंबर 2020 (गुरुवार) पर्यंत करण्यात आली आहे.

हरकती व सुचनावर अभिप्राय देऊन अंतीम प्रभाग रचना प्रस्ताव विभागीय आयुक्त यांना सादर करण्याची मुदत दिनांक 10 डिसेंबर 2020 ऐवजी दिनांक 15 डिसेंबर 2020 (मंगळवार) ही निश्चित केली असून विभागीय आयुक्त यांनी अंतीम प्रभाग रचनेस मान्यता देणेचा दिनांक 17 डिसेंबर 2020 ऐवजी दिनांक 24 डिसेंबर 2020 (गुरुवार) करण्यात आली आहे व अंतीम प्रभाग रचना अधिसुचना जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्द करण्याची तारीख दिनांक 24 डिसेंबर 2020 ऐवजी दिनांक 30 डिसेंबर 2020 (बुधवार) निश्चित केली आहे. या चारही नगर पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.

Top