Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

पोस्ट ऑफिस व्दारे कॉमन सर्विस सेवा पुरविण्यात येणार

पोस्ट ऑफिस व्दारे कॉमन सर्विस सेवा पुरविण्यात येणार

लातूर (जिमाका) : कॉमन सर्विस सेंटर व्दारे पुरवल्या जाणाऱ्या सेवा, उस्मानाबाद डाक विभाग, मुख्यालय लातूर अंतर्गत येणाऱ्या पूढील डाक कार्यालयाव्दारे पुरवण्यात येत आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. कॉमन सर्विस सेंटर व्दारे पुरवल्या जाणाऱ्या सेवांची यादी https://csc.gov.in/ या संकेत स्थळावर उपलब्ध्‍ आहे. असे डाकघर अधीक्षक, उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

डाक कार्यालयाचे नाव - लातूर मुख्य डाकघर, निलंगा उप डाकघर, टिळक नगर उप डाकघर, उदगीर डाकघर, अहमदपूर उप डाकघर, तुळजापूर उप डाकघर, भूम उप डाकघर व उमरगा उप डाकघर येथे असेल असे डाकघर अधीक्षक, उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Top