Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

एक दिवस एक वार्ड उपक्रमाअंतर्गत महावितरण कर्मचारी साधनार ग्राहकांशी संवाद

एक दिवस एक वार्ड उपक्रमाअंतर्गत महावितरण कर्मचारी साधनार ग्राहकांशी संवाद

ग्राहकांच्या विजबिल तक्रारींसह विज वितरणातील अडथळ्यांचे करणार निरसन

लातूर : लातूर शहरात एक दिवस एक वार्ड उपक्रमा अंतर्गत महावितरण कर्मचारी ग्राहकांशी संवाद साधनार आहेत. एक दिवस एक वार्ड हा उपक्रम सहव्यवस्थापकिय संचालक औरंगाबाद (IAS) डॉ. नरेश गिते यांच्या आदेशानुसार चालू करण्यात आला आहे. मंगळवार, दि. 16 नोव्हेंबर 2020 पासून शहर शाखा क्रं. 7 अंतर्गत मुख्यअभियंता दिलीप भोले, कार्यकारी अभियंता गणेश सामसे, व अतिरिक्त का. अभियंता राजाभाऊ वडने यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस एक वार्ड हा उपक्रम राबिण्यात येत आहे. या उपक्रमा अंतर्गत रोहीत्राची दुरुस्ती, तारा ओढणे, ग्राहकांच्या विज बिलाच्या तक्रारींचे निरसन करुन ग्राहकांना थकीत विज बील भरण्यासाठी प्रोत्साहीत तसेच बील भरुन घेणे, तारेला लागलेल्या झाडांच्या फांदृया तोडणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.

 

एक दिवस एक वार्ड या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्यअभियंता दिलीप भोले, कार्यकारी अभियंता गणेश सामसे, व अतिरिक्त का. अभियंता राजाभाऊ वडने यांच्या मार्गदर्शनाखाली क्रं. 7 चे सहायक अभियंता दिपक पळसे, दस्तगिर शेख, प्रविण मोरे, करण धोत्रे, अविनाश गिरी, आतूल फावडे, श्रीमती पुनम कांबळे, वैशाली चिकटे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

Top