Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

"इंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी"

"इंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी"

पीसीआरए चा 'सक्षम' गृह ऊर्जा प्रबंधन जनजागृती कार्यक्रम संपन्न

लातूर : दि ६ जाने रोजी महात्मा फुले सामाजिक विकास मंडळ; वसुंधरा शेतकरी बचत गट गंगापूर आणि पीसीआरए (PCRA) च्या वतीने संयुक्त गृह ऊर्जा प्रबंधन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केदार खमितकर यांनी इंधन बचतीसाठी 'एलपीजी का कुशल उपयोग' विषयांवरती मार्गदर्शन केले. डॉ. बालाजी गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

वसुंधरा शेतकरी बचत गट गंगापूर व ग्रामीण परिसरातील महिला इंधन संरक्षण अभियान मधे सहभागी झाले. 'घरगुती गॅसचा अतिरिक्त वापर टाळा, इंधन वाचवा आणि बचत वाढवा' असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन सौ.सविता फुटाणे व सौ. संगीता जगताप यांनी केले. इंधन हा एक असा पदार्थ आहे की ज्याच्याशिवाय आजच्या या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात जगणे मुश्किल आहे. त्यामुळेच तर् इंधनाचा वापर आपण काटकसरीने केला पाहिजे आणि इंधन बचत करण्यासाठी हातभार लावला पाहिजे. पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ  यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय इंधन बचत मोहिम औद्योगिक, वाहतूक, कृषी आणि घरगुती क्षेत्रात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. कोळसा, तेल, वायू, इंधन लाकूड इत्यादी जाळल्यामुळे वातावरणातील प्रदूषण वाढते त्यात  कार्बन ऑक्साईड्स, सल्फर, नायट्रोजन व इतर हानिकारक पदार्थांचा समावेश आहे. यावेळी पर्यायी अपारंपरिक ऊर्जा-सौर ऊर्जा कुकर या विषयावरती डाक्यूमेंट्री फिल्म दाखविण्यात आले.

Top