Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लातूर : लातूर जिल्हा युवक काँग्रेसची बैठक महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सहप्रभारी तथा मराठवाड्याचे प्रभारी विजयसिंग राजू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार रोजी काँग्रेस भवन येथे लातूर जिल्हा व शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीमध्ये बीजेपी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे आणले आहेत त्या विरोधात युवक कॉंग्रेसच्या रणनिती बाबत चर्चा करण्यात आली व युवक काँग्रेस पक्ष संघटने बाबत व विविध आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली. युवक कॉंग्रेसच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल्यजी उटगे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे अजित सिंहजी, प्रणित जांभूळे, डॉ. दिनेश नवगिरे, पुनीत पाटील, एकनाथ पाटील, राजू गवळी, ऍड. दीपक राठोड, अभिषेक पतंगे, गोविंद आलुरे, मजहर टाके, युनूस शेख, आदिल इनामदार, महेश काळे आदीसह जिल्हा युवक काँग्रेसचे व शहर जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Top