Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

सर्वसामान्यांसाठी विश्वासाचे दुसरे नाव; लातूर जिल्हा बँक - माजी मंत्री दिलीपराव देशमुख

सर्वसामान्यांसाठी विश्वासाचे दुसरे नाव; लातूर जिल्हा बँक - माजी मंत्री दिलीपराव देशमुख

शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लातूर जिल्हा बँकेची भूमिका

सोयाबीन, सौरऊर्जा, सोलार पंप प्रकल्पाला बॅक कर्ज देणार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घोषणा

लातूर जिल्हा बॅंकेची ३७ वी सर्वसाधारण सभा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्रात लातूर जिल्हा प्रगतीशील आदर्श जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगून लातूर जिल्हा बँकेने काही धोरणात्मक निर्णय घेतले असुन या निर्णयात सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक होते. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील  सोयाबीनवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प व सोलार पंप प्रकल्पासाठी  बॅक पतपुरवठा करणारं आहे. बागायती बरोबर  कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी कर्ज देण्यासाठी  धोरण ठरवित असून सर्वांना नेहमीच मदत करण्याची भूमिका लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेली आहे, यामुळे सर्वसामान्यासाठी विश्वासाचे दुसरे नाव हे लातूर जिल्हा बँक झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केले. ते सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयात ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

पुढें बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की राज्यात लातूर जिल्हा बॅंकेने वेगवेगळे निर्णय घेवुन न्याय मिळवून देण्यासाठी सभासद शेतकरी याना आर्थिकदृ्टया सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला असून ३ लाख रुपये कर्ज शून्य टक्के दराने, तुती लागवड साठी शून्य टक्के दराने दोन लाख रुपये कर्ज देण्याचा धाडसी निर्णय घेतला त्यात शेतकऱ्यांना मोठी मदत झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला दिसतं आहेत त्यात बॅंकेच्या आर्थिक विकासाकडे लक्ष वेधून  जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या चेहर्यावर हास्य हे आमचे यश आहे असे सांगून येणाऱ्या काळात पक्ष, जात, धर्म, यांच्या पलीकडे जावून सर्वांना मदत करण्याची भूमिका जिल्हा बॅंकेची राहिलेली आहे पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हीं काम करणारं आहोत राज्यात लातूर पॅटर्न राज्यभर नाव झाल आहे त्यात आदर्श  लातूर जिल्हा करण्यासाठी  आपण सर्वांनी प्रयत्न क रू या असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे

 

यावेळी सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, रेणा साखर कारखान्यांचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन रवींद्र काळे उपस्थित होते.

Top