Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे लातूर येथे आंदोलन

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे लातूर येथे आंदोलन

काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुर्बीण लावून शोधले मोदींचे अच्छे दिन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध व अच्छे दिनचे दुर्बीण द्वारे शोधमोहीम हाती घेण्यात आली. अच्छे दिनचे स्वप्न दाखवत 50 पैसे पेट्रोल भाव वाढ झाली म्हणून देशात आंदोलन करून आम्ही सत्तेवर आल्यास पेट्रोल व गॅसचे भाव सर्वसामान्य जनतेला परवडतील असे सांगून अच्छे दिन येणार महागाई कमी होणार 15 लाख देणार 2 कोटी रोजगार देणार म्हणून लोकांच्या भावनेशी खेळत सत्ता आल्यानंतर गेली सात वर्षे जनतेच्या पाठीत रोजगार, महागाई पेट्रोल भाववाढ गॅस दर भाववाढ, याचा खंजीर खुपसून हम दो हमारे दो म्हणत उद्योग धार्जिन बड्या उद्योगपती साठी निर्णय घेणाऱ्या व सर्वसामान्य जनतेला व शेतकऱ्याला आर्थिक संकटात व देशोधडीला लावणार्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

बीजेपी सरकार आल्यापासून गेली अनेक वर्ष अच्छे दिन कुणालाच दिसले नाही अच्छे दिनाचा अनुभव कोणीही घेतला नाही. ते अच्छे दिन दुर्बीण द्वारे तर दिसतील म्हणून शहर युवक काँग्रेसने दुर्बिणीद्वारे अच्छे दिनाची शोधमोहीम हाती घेण्यात आली. गॅस पेट्रोल दरवाढीचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. पेट्रोल गॅस व डिझेल चे भाव बीजेपी सरकारने नियंत्रित नाही केल्यास युवक काँग्रेस आणखी तीव्र आंदोलन आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला. तसेच जनता मायबाप सरकारचा या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जनतेच्या सहनशीलतेला युवक काँग्रेसच्या वतीने सलाम करण्यात आला.

याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य दादा उटगे, माजी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व्यंकटजी बेंद्रे, लातूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, लातूर शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते दीपक सुळ, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विजय निटूरे, लातूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मोहन सुरवसे, सुंदर पाटील कव्हेकर,मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भोसले साहेब, गोविंद आलुरे, अभिषेक पतंगे, राजू गवळी, आकाश दुर्गे, इसाक शेख,  श्रीशैल्य गडगडे, सुनील वाले, विकास सूर्यवंशी, आशुतोष मुळे,पंकज शिंदे, हंसराज शिंदे, आनंद भाई वैरागे, एम .पी .देशमुख ,धनंजय गायकवाड, अजय वाघदरे, बालाजी झिपरे, युनूस शेख, सौरभ खरोसेकर, जफर पटवेकर, रणधीर सुरवसे,जयदेव मोहिते, बालाजी सोनटक्के, अभिजीत इगे, संदीप सवई, अभिषेक सौताडकर, अरफात पटेल, रोहित काळे, मनोज भाळके, विजय टिकेकर, अकबर माडजे, ओमप्रकाश येळीकर, एम एच शेख, अमोल गायकवाड, महेश शिंदे, अबू मनियार, शेख मोहसीन, शेख खाजा पाशा, विनय इंगळे, आयुष्यमान गूडले, अजित सूर्यवंशी, लातूर शहर युवक काँग्रेसचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Top