हरंगुळ (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील हरंगुळ (बु.) येथील आरोग्य उपकेंद्रात काल शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी कोरोना लसीकरणास मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी हरंगुळ (बु.) परिसरातील 45 वर्षेच्या पुढील वयाच्या जवळपास 60 नागरिकांनी लस घेऊन हा शुभारंभ करण्यात आला.
मौजे हरंगुळ (बु.)चे सरपंच सूर्यकांत सुडे यांच्या हस्ते लस देण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सन्मानिय जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे, पंचायत समिती सदस्य अरविंद सुरकुटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सारडा साहेब, वैद्यकिय अधिकारी डॉ. साळुंके सर, हरंगुळ (बु.) उपकेंद्राचे डॉ. कुरेशी, ए.एच.कांदे, ए.एन.एम. पाटील मॅडम, शिंदे मॅडम, हरंगुळ (बु.)चे ग्राम विकास अधिकारी चलमले साहेब, आंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्त उपस्थित होते.
या वेळी सोशियल डिस्टन्सींगचे पालन करुन कोरोना विषाणू बाबत सविस्तर माहिती देऊन वैद्यकिय अधिकारी यांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी लस घेणे अतिशय गरजेचे आहे असे सांगितले. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस कशा प्रकारे कार्य करते आणि यामुळे कोरोनापासून होणारा मृत्यू कसा टाळता येतो याबद्दल सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सारडा साहेब यांनी सर्व उपस्थितांनी सांगितली.
कार्यक्रमाच्या शेवटी गावकर्यांना लसीची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि गावातील लोकांना प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी 45 वर्षेच्या पुढील वयाच्या जवळपास 100 लोकांसाठी ही लस उपलब्ध असेल आणि याचा अधिका अधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन ही सरपंच सूर्यकांत सुडे यांनी गावकर्यांना केले. यावेळी जि.प. सदस्य परमेश्वर वाघमारे यांनी लस उपलब्ध करुन गावकर्यांना सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रशासकीय अधिकारी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचे गावकर्यांच्या वतीने आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता केली.