औरंगाबाद (विमाका) : 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता मंगळवार, दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत एकूण 45 वैध ठरलेल्या अर्जांपैकी 10 उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आहे.
अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. 1) अक्षय नवनाथराव खेडकर, औरंगाबाद 2) ईश्वर आनंदराव मुंडे, बीड 3) अंभोरे शंकर भगवान, औरंगाबाद 4) जयसिंगराव गायकवाड पाटील, औरंगाबाद 5) प्रविणकुमार विष्णु पोटभरे, बीड 6) विजेंद्र राधाकिसन सुरासे, जालना 7) विवेकानंद शशीकांत उजळंबकर, लातूर 8) शेख गुलाम रसुल कठ्ठु, औरंगाबाद 9) संजय शहाजी गंभीरे, बीड 10) संदिप बाबुराव कराळे, नांदेड.
05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.