Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

बसपूर मध्ये 70 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन

बसपूर मध्ये 70 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन

निलंगा : शासनाच्या योजना ग्रामीण भागातील सामान्य नागरिकापर्यंत पोंहचवण्याचे काम बसपूर ता. निलंगा ग्रामपंचायतकडून झाले असून अन्य ग्रामपंचायतीने याचा आदर्श घ्यावा असे मत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी शनिवारी ता. 31 रोजी केले बसपूर येथे 70 लाखाच्या विकास कामाच्या उद्घाटना प्रसंगी  व्यक्त केले .

बसपुर ता. निलंगा येथे विविध विकास कामाच्या उद्घाटन सुरक्षा किट वाटप प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी  सरपंच श्रीमती भारत बाई लक्ष्मण काळगे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण सभापती संजय दोरवे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश बद्दे, ज्येष्ठ कार्यकर्ते दगडू सोळुंगुंडेराव जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तानाजी बिरादार, पंचायत समिती सदस्य कालिदास पाटील, शेंदचे सरपंच बालाजी मोगरगे, ताजपुर चे सरपंच जनार्दन सोमवंशी अशोक शिंदे, सुमनबाई बिरादार यासह आदीची उपस्थिती होती.

यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की केंद्र राज्य शासनाच्या योजना ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत सक्षम पणे पोहोचण्याचे काम ग्रामपंचायत करीत असते या ग्रामपंचायतीकडून अनेक योजना सामान्य नागरिकापर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे त्यामध्ये प्रधानमंत्री श्रमजीवी योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना, अपंग कल्याण योजना यासह गाव विकासासाठी असलेल्या योजना राबविण्यात आले आहेत केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आल्यामुळे या दोन्ही शासनाचा काळ अतिशय उज्ज्वल असून भविष्यातही राज्यामध्ये भाजप-सेना युतीची सत्ता येणार आहे त्यामुळे नागरिकांनी खंबीर पुणे या सरकारच्या पाठीशी उभे राहावे अशी मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

 यावेळी गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला शिवाय कामगार विभागाकडून सुरक्षा किट आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड पंतप्रधान श्रमयोगी योजना चे कार्ड लाभार्थ्यांना देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कडाजी क्षीरसागर तर प्रास्ताविक दादाराव कांबळे यांनी केले यावेळी संजय दोरवे, ऋषिकेश बद्दे, हमीद शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील अण्णाराव बिरादार, राम बिरादार, दत्ता नरवटे, अण्णाराव मल्लिशे, दत्तू अजणे, सखाराम काळे, सुधाकर बिरादार ,गुणवंत बावचे, जोतीराम कुमठे, कीशन नरवटे यासह आदीनी परिश्रम घेतले.

Top