Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लातूर जिल्हयामध्ये मातृ वंदना सप्ताहयास सुरुवात

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत लातूर जिल्हयामध्ये मातृ वंदना सप्ताहयास सुरुवात

लातूर : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे तसेच माता व बालमृत्यू दरात घट होवून तो नियंत्रित रहावा यासाठी महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत दि. 2  डिसेंबर ते 8 डिसेंबर 2019 या सात दिवसाच्या कलावधीमध्ये मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण आठवडा विविध उपक्रमांचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

शहरी व ग्रामीण भागासाठी लागू असलेल्या या योजनेच्या जनजागृतीसाठी माृत वंदना सप्ताह चे आयोजन करण्यात आलेले आहे. या याजनेतंर्गत  प्रथमच ज्या मातांची प्रसृती झाली किंवा गर्भधारणा झाली असेल त्यांना शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल  अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी एकूण तीन टप्पयात रुपये 5000/- चा लाभ मिळतो.

या योजने अंतर्गत पात्र लार्भ्याना एकूण रु 5000/- लाभ त्यांचे बॅक खातेवर देण्यात येतो. लाभ दयावयाच एकूण 3 टप्पे आहेत.

लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : लाभार्थी व त्यांच्या पतीचे आधार कार्ड,  लाभार्थीचे आधार संलगन बॅक खाते, गरोदपणाची शासकिय आरोग्य संस्थेत 100 आत नोंद, शासकिय संस्थेत गरोदरपणा दरम्यान  एकदा तपासणी, बाळाची जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण.

या सप्ताहमध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि सर्व क्षेत्रामध्ये माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आज दि.2 डिसेंबर  2019 रोजी मातृ वंदना सप्ताह जनजागृती व प्रसिध्दीकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथून रॅलीचे आयोजन करुन या सप्ताहाची सुरुवात केली तसेच  जिल्हास्तरीय शुभारंभाचा  कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी ता.लातूर, येथे आरोग्य सभापती प्रकाशरावजी देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई ढमाले, पंचायत समिती सदस्य पंडीत ढमाले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर या सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

  या  प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ.संजय ढगे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जी.जी.परगे ,माता बाल संगोपन अधिकारी डॉ.बरुरे बालाजी,   तालुका आरोग्य अधिकारी  डॉ.सारडा अशोक,गटविकास अधिकारी गोडभरले, बालविकास अधिकारी  श्री.बंडगर, शिंदे, बलवाड व डॉ. भागवत, डॉ. पठाण सगीरा, गुंडरे, सचिन, चव्हाण, नळगीरकर, यादव, कुरील, कदम, श्रीमती भोगे, श्रीमती सारगे, आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी, गटप्रर्वतक, आदी सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर सप्ताहाचा उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थितीत मान्यवरांनी जिल्हयातील पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Top