Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

मेडीकल कॉलेज प्रवेशाबाबत मराठवाड्यावरील अन्याय थांबवा - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

मेडीकल कॉलेज प्रवेशाबाबत मराठवाड्यावरील अन्याय थांबवा - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

मागणी पुर्ण न झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा

लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये मेडीकल कॉलेज प्रवेशासाठी प्रदेशवार 70-30 चा नियम सन 2000 पासून केलेला आहे. परंतु हा नियम घटनादुरूस्ती अथवा कायदा करून केलेला नाही. यामुळे मराठवाडा व विदर्भातील विद्यार्थ्यांवर प्रचंड मोठा अन्याय होत आहे. हा विषय आम्ही मराडवाडा विकास परिषदेत 15 जून 2019 रोजी मांडला होता. तसेच या ठरावामध्ये शासनाकडे हा नियम रद्द करण्याची मागणीही केली होती. परंतु तो अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे व लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमीत देशमुख यांच्याकडे लेखीपत्राद्वारे करण्यात आलेली आहे. अशी माहिती माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.

विद्यार्थी हितासाठी न्याय द्यावा

लातूरने नीट परिक्षातील यशामुळे लातूरपॅटर्ण देशात निर्माण केला, परंतु 70-30 च्या चुकीच्या नियमामुळे पश्चिम महाराष्ट्रात लातूरच्या विद्यार्थ्यांना 70 नंतर प्रवेश मिळत आहे. आज पश्चिम महाराष्ट्रात मेडीकलचे 26 कॉलेज असून विद्यार्थी संख्या 3950 आहे,  विदर्भात 8 कॉलेज व 1190 विद्यार्थी, मराठवाड्यात 5 कॉलेज व 680 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हा सरासर अन्याय आहे. याचा परिणाम चांगले गुण घेऊनही 70-30 मुळे प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थी व पालकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे हा अन्यायकारी घटणाबाह्य नियम रद्द करावा, अन्यथा या प्रश्नासाठी जन आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आलेल्या लेखीपत्राद्वारे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिला आहे.

Top