रुक्मिणी कदम : शेतमजुरी ते महिना लाख रुपये कामावणारी यशस्वी उद्योजिका
लातूर : शेतात मोल-मजूरी करुन आपला व आपल्या कुटूंबाचा उदर्निरवाह करणारी सर्वसाधारण महिला मनात आणलं तर काय करु शकते याचे उदाहरण म्हणजेच तळणी गावच्या रुक्मिनी कदम होय.
आपल्या कुटूंबाला आर्थिक सक्षम करत सोबतच्या चार-चौघींनाही स्वत:च्या पायावर उभारुन खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर केले आहे. रुक्मिणी कदम यांनी शेतमजूर ते महिना लाखभर रुपये कमावणारी यशस्वी उद्योजिका होऊन समाजत उद्योग करण्यासाठी वेळ बरोबर नाही, पैसा नाही, कोणी मदत करत नाही, सरकार आम्हाला मदत करत नाही व बँका पैसे देत नाहीत असे म्हणत रडत बसणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.