Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

दिलीपरावजी देशमुख : सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व

दिलीपरावजी देशमुख : सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व लातूर : महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात अग्रणी नाव म्हणजे लोकनेते राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रातील मांजरा, रेणा, विलास, जागृती, साखर कारखाने जिल्हा बँक, बाजार समिती, या सहकारी तत्वावर संस्था चालत आहेत. नुसत्या चालत नाहीत त्या नफ्यात चालून ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे काम माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे. गेल्या 8 वर्षात राज्यात सहकार चळवळीला घरघर लागली असताना लातूर जिल्हा मात्र याला अपवाद ठरले हे केवळ सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ही सहकार चळवळ टिकून राहिली एवढेच नाही तर राज्यात सहकार क्षेत्रात लातूरचा नवा पॅटर्न तयार झाला. याचे श्रेय दिलीपराव देशमुख साहेब यांना जाते आज 18 एप्रिल रोजी रविवारी त्यांचा वाढदिवस आहे राज्यात सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा नावलौकिक आहे त्यांना वाढदिवसा च्या निमीत्ताने हार्दिक शुभेच्छा. राजकारण समाजकारण करीत असताना लोकनेते विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने सहकार चळवळीला बळ दिले त्याच्यांच पावलावर पाऊल ठेवून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब हे सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, जिल्हा बँक, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालू आहेत त्या पण अव्वल स्थानावर झेप घेतली आहे नुसते चालू नसून साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बाजू सक्षम करण्याचे काम या मांजरा परिवाराकडून झाले आहे ते सुरूच आहे लोकनेते विलासराव देशमुख साहेब म्हणत असायचे एखादे वेळेस तोटा सहन आपण करू पण शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची भूमिका आमची आहे हि पुढें राहील तीच परंपरा आजही मांजरा परिवार जोपासत आहे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढें सुरू आहे सहकार क्षेत्रातील साखर कारखाना असो की जिल्हा बँक असो की या कुठल्याही सहकारी संस्थेत चुकीचे काम होणार नाही कायदेशीर होणार हे वाक्य या संस्थेच्या कुठल्याही युनिट मधे जावा हे आपल्याला दिसेल अगदी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुधा संगणक सिस्टीम द्वारे उसाची तारीख कळते जिल्हा बँकेत तर कायदेशीर बाबी तपासून तातडीने कर्ज देण्याची भूमिका असते या सर्व बाबीं आदरणीय साहेब यांचे सूक्ष्म नियोजन व व्यवस्थापन यांची अंमलबजावणी प्रक्रिया जलदगतीने करण्याचे काम संस्था करीत असतात त्यामूळे आज सहकारातील संस्था टिकून ताठ मानेने उभ्या आहेत

सहकारी संस्था जिल्हा बँकेमुळे ग्रामीण भागात आर्थिक सुभता मिळाली राज्यातील अनेक जिल्हयात जिल्हा बँका, सहकारी साखर कारखाने आर्थिक डबघाई ने चळवळी मंदावल्या मात्र लातूर जिल्हा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या सहकार क्षेत्रातील संस्थेला धक्का लागू दिला नाही चुकीचे काम होऊ दिले नाही या संस्थेचे आम्ही विश्वस्त आहोत खरे मालक तुम्ही आहात जिल्हा बँक ही कल्पवृक्ष आई आहे आम्ही राखणदार आहेत असे साहेब जेव्हा भाषणात सांगतात तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे अनेक लोकोपयोगी निर्णय साहेबांनी घेतले शेतकऱ्यांच्या मुलीला लग्नासाठी शुभमंगल कर्ज, शिक्षणासाठी कर्ज, 3 लाख रुपये बिन व्याजी कर्ज देणारी राज्यातील पहिली लातूर जिल्हा बँक आहे असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेवुन समाजाला न्याय देण्याचे काम सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी केले आहे.

राजकारण कमी समाजकारण जास्त राजकारणात राहूनही सर्वांना मदत करण्याची भूमिका देशमुख परिवाराची राहिलेली आहे सहकार महर्षी दिलीपराव देशमुख राजकारणाच्या आखाड्यात राहून सुधा अनेकांना मदत करत असतात राजकारण फक्त निवडणुकीपूरते 15 दिवस पुन्हा मात्र समाजकारण करायचे ते नेहमी म्हणतात अडीअडचणीच्या लोकांना मदत करणे भुकेजलेल्या लोकांना अन्नदान करणे ही फार मोठी समाज सेवा आहे अशा सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व असलेले राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा घडो हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना करतोय हरिराम कुलकर्णी (जेष्ठ पत्रकार) प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया काँग्रेस मुंबई ९९७००८१०७७

Top