Arun Hande - Mob No. +91 8788392896, +91 9421092888
    LCN24 - आपला आवाज : लातूर परिसरातील घडामोडींचा वेगवान आढावा घेणारे वेब पोर्टल.

निटूर (मोड) येथील व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष पदी लतिफ चाऊस तर सचिवपदी शिवशंकर हासबे यांची नियुक्ती

निटूर (मोड) येथील व्यापारी मंडळाच्या अध्यक्षपदी नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष पदी लतिफ चाऊस तर सचिवपदी शिवशंकर हासबे यांची नियुक्ती

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा तालुक्यातील निटूर (मोड) येथील व्यापारी मंडळाच्या सर्व व्यापार्‍यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्ष नवनाथ बुडगे, उपाध्यक्ष लतिफ चाऊस,सचिव शिवशंकर हासबे यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.

 याप्रसंगी, कोषाध्यक्ष बबन उकळे, सहसचिव चंदर उकळे तसेच,सल्लागार समितीत पंकज भालके, सुदाम साळुंखे, पंडीत दुधनाळे, हसन मोमीन, मलिक गस्ते तसेच, प्रसिध्दीप्रमुखपदी अनिल गायकवाड, फरज चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्य राजकुमार चव्हाण,नरसिंग उकळे आदी व्यापार्‍यांच्या उपस्थितीत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

नवनियुक्त व्यापारी मंडळ, निटूर (मोड) चे अध्यक्ष नवनाथ बुडगे यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी संवाद साधताना, येणार्‍या काळात आपण ही जबाबदारी पूर्णपणे चांगल्यापध्दतीने संभाळून व्यापार्‍यांच्या अडीअडचणी सोडवण्यात येतील, असे सांगितले. या व्यापारी मंडळ निटूर (मोड) चे सर्वञ स्वागत होत आहे. 

Top